चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

By admin | Published: July 18, 2014 02:45 AM2014-07-18T02:45:23+5:302014-07-18T02:45:23+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेतील पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीतील गोंधळाच्या चौकशीसाठी कुलगुरु डॉ़ बी़ए़ चोपडे यांनी गुरुवारी उच्च स्तरीय समिती नेमली

High-level committee for inquiry | चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती

Next

अश्विनी मघाडे, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी शाखेतील पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीतील गोंधळाच्या चौकशीसाठी कुलगुरु डॉ़ बी़ए़ चोपडे यांनी गुरुवारी उच्च स्तरीय समिती नेमली. ही समिती दोन दिवसांत आपला अहवाल सादर करणार आहे़
अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिका तपासणीतील गोंधळ ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे चव्हाट्यावर आणला होता. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. औरंगाबादेत दाखल होताच कुलगुरुंनी गुरुवारी या प्रकरणी तातडीची बैठक घेतली. कुलसचिव डॉ. डी. आर. माने, परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण, पीईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजीत वाडेकर, तंत्रशिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. पेपर तपासणीतील त्रुटींबाबत या बैठकीत चर्चा झाली.
पेपर तपासणीतील गैरप्रकार अतिशय गंभीर आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल, असे चोपडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: High-level committee for inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.