राज्यात कापसाला सर्वाधिक भाव अकोटात!
By Admin | Published: January 12, 2017 02:24 AM2017-01-12T02:24:45+5:302017-01-12T02:24:45+5:30
हमीदरापेक्षा दीड हजाराने जास्त भाव; ५ हजार ८00 रुपये दराने खरेदी.
विजय शिंदे
अकोट, दि. ११- ह्यविदर्भातील कॉटन बेल्टह्ण अशी ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात कापसाला प्रतिक्विंटल ५ हजार ८00 एवढा भाव देण्यात येत आहे. कापसाला मिळणारा हा दर राज्यात सर्वाधिक आहे. आतापर्यंत अडीच लाख क्विंटल कापसाची खरेदी या भागात करण्यात आली असून, अजूनही आवक सुरू आहे. शासनाच्या हमीदरापेक्षा दीड हजाराने जास्त भाव मिळत असल्याने शेतकर्यांत समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र हे देशातील दुसर्या क्रमांकाचे कापूस उत्पादक राज्य आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी राज्यात २१८ तालुक्यात एकूण ३७ लाख ७३ हजार ५00 हेक्टर क्षेत्रावर कपाशीचा पेरा झाला आहे. गतवर्षातील कापसाच्या दरातील चढ-उतार व कीड, रोगराईनंतरही कापसाच्या लागवडक्षेत्रात किंचित का होईना वाढ झालेली आहे. अशा स्थितीत अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी ५ हजार ६00 ते ५ हजार ८00 रुपये भाव देण्यात येत आहे. सरासरी पाच वर्षाच्या तुलनेत हा भाव सर्वाधिक आहे. शासनाने ४ हजार १६0 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, या हमीभावापेक्षा शेतकर्यांना जास्त भाव मिळत आहे. या भागातील कपाशीमध्ये सरकीच्या तुलनेत सर्वाधिक रुई निघत असल्याने चांगला भाव देण्यात येत आहे. गतवर्षी ७८ लाख गाठींचे उत्पादन राज्यात झाले होते. यावर्षी ८७ लाख गाठींचे उत्पादन होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ८३ हजार खंडी, असा रुईला भाव मिळत असल्याने स्थानिक शेतकर्यांना प्रतिक्विंटल ५ हजार ८00 एवढा भाव मिळत आहे. अकोट बाजारपेठेत ३१ डिसेंबरपर्यंत अडीच लाख क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. अनेक शेतकर्यांचा कापूस अद्यापही शेतामध्ये आहे. अशा स्थितीत कापसाला ५ हजार ८00 एवढा भाव मिळत असल्याने बाजार समितीत मोठय़ा प्रमाणात कापसाने भरलेली वाहने उभी आहेत. स्थानिक जिनिंगमध्येसुद्धा कापसाची आवक वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बांग्लादेशमध्ये रुईची मागणी वाढली आहे. त्यामुळे भाव वाढत आहेत. शिवाय या भागातील कापसामध्ये सर्वात जास्त रुई निघत आहे. शेतकर्यांना विक्रमी भाव मिळत आहे.
- प्रमोद चांडक, कापूस व्यापारी, अकोट
उत्कृष्ट दर्जाचा कापूस येत आहे. जिनिंग फॅक्टरींमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे अकोट बाजार समितीत हर्रासीत शेतकर्यांच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे. पैशाचा चुकारा वेळेवर व व्यवस्थित होत असल्याने बाजार समितीत कपाशीची आवक वाढली आहे.
- राजकुमार माळवे, सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोट