मालेगावमध्ये सर्वाधिक तापमान
By admin | Published: April 20, 2015 02:13 AM2015-04-20T02:13:42+5:302015-04-20T02:13:42+5:30
राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, रविवारी हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मालेगावमध्ये पारा ४३.५ अंश सेल्सिअसवर गेला आहे.
पुणे : राज्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, रविवारी हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मालेगावमध्ये पारा ४३.५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. त्याखालोखाल वर्धा येथे ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे. अवकाळीचे ढग सरल्यानंतर पारा चढू लागला आहे. रविवारी राज्यांत बहुतेक शहरांत उन्हाची तीव्रता वाढली होती. विदर्भात चंद्रपूर व यवतमाळ वगळता सर्वच शहरांतील कमाल तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातही महाबळेश्वर व सांगली वगळता इतर शहरांमध्ये कमाल तापमानाने सरासरी ओलांडली आहे. राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला असल्याने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)०