दरड कोसळल्याने महामार्ग खचला

By admin | Published: August 6, 2016 02:44 AM2016-08-06T02:44:19+5:302016-08-06T02:44:19+5:30

पोलादपूरपासून अंदाजे ३३ किलोमीटर ८०० मीटर अंतरावर दरड कोसळून रस्ता खचल्याने गेले दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती.

The highway collapsed due to the collapse of the ridge | दरड कोसळल्याने महामार्ग खचला

दरड कोसळल्याने महामार्ग खचला

Next


पोलादपूर : पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावर मेटतले ग्रामपंचायत हद्दीत पोलादपूरपासून अंदाजे ३३ किलोमीटर ८०० मीटर अंतरावर दरड कोसळून रस्ता खचल्याने गेले दोन दिवस वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीच्या सहाय्याने दगड, मातीचा आलेला भराव बाजूला करून एकेरी वाहतूक चालू केली होती, मात्र पुन्हा रस्ता खचल्याने गुरुवारी संध्याकाळपासून पोलादपूरकडून महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलिसांकडून मिळाली.
दरवर्षी पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगाही पडलेल्या आहेत. संततधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली असून, प्रशासनचे याकडे दुर्लक्ष होत आहे. घाटातील रस्ता खचून एक हजार फूट खोल दरीत कोसळल्याने मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.
महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणारी एसटी वाहतूकही बंद केली आहे. महाबळेश्वर तालुक्यातील वाडा परिसरात किल्ले प्रतापगडकडे जाणाऱ्या मार्गावर भली मोठी दरड कोसळली होती, मात्र प्रशासनाने ती दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच रस्त्यावर दरड आल्याने आतील गावाकडे जाणारी वाहतूक ठप्प आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील चिरेखिंडजवळील धबधब्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीजवळचा भराव वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. दरवर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लाखोंचा निधी खर्च करण्यात येतो.
>पाण्यासाठी जागाच नाही
पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील चिरेखिंडजवळील धबधब्याजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीजवळचा भराव वाहून गेल्याने रस्ता धोकादायक बनला आहे. सदर मोरीचे काम यंदाच करण्यात आले असले तरी पाणी जाण्यासाठी पुरेशी जागा ठेवली नसल्याने आलेल्या दरडीतून मोठे दगड येवून मोरी बंद झाल्याने संपूर्ण पाणी रस्त्यावर येवून रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: The highway collapsed due to the collapse of the ridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.