महामार्गावर माझेरी घाटात कोसळली दरड

By Admin | Published: April 3, 2017 03:41 AM2017-04-03T03:41:45+5:302017-04-03T03:41:45+5:30

महाड-वरंध-भोर-पंढरपूर मार्गावर माझेरी घाटात मध्यरात्री ३ वाजता दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला

Highway on my highway collapsed | महामार्गावर माझेरी घाटात कोसळली दरड

महामार्गावर माझेरी घाटात कोसळली दरड

googlenewsNext

महाड : महाड-वरंध-भोर-पंढरपूर मार्गावर माझेरी घाटात मध्यरात्री ३ वाजता दरडी कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र, आठ तासांच्या प्रयत्नांनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने या दरडी दूर केल्याने रविवारी सकाळी १० वा. नंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र, त्या वेळी घाटात सुदैवाने वाहनांची वर्दळ नसल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या घाटातील कड्यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने पावसाळ्यातही दरडी कोसळण्याचा धोका अधिक संभवत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दिली.
महाड-भोर-पंढरपूर हा प्रमुख राजमार्ग क्र. १५ म्हणून ओळखला जात असून या मार्गावरून पुण्याकडे जाण्यासाठी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी या मार्गाचा वापर करतात. अत्यंत अवघड व धोकादायक वळणे असलेल्या या माझेरी-वाघजाई घाटातून वाहने चालवणे मोठे जिकिरीचे असते. पावसाळ्यात अनेक वेळा या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात या मार्गावरून वाहन चालकांना व प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास माझेरी गावापासून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर तीन कि.मी. अंतरावर ही दरड कोसळली. याबाबतचे वृत्त समजताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम. एन. म्हस्के व सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अमृत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही दिशेची वाहतूक थांबवली व जेसीबी यंत्राच्या साह्याने कोसळलेल्या दरडी बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. सकाळी १० वा. मार्गावर कोसळलेल्या दरडी मातीचे ढिगारे बाजूला केल्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. महाड आगारातून सुटणाऱ्या भोर मार्गे पुणे एसटी बसेस ताम्हाणी मार्गे पुण्याकडे सोडण्यात आल्या तर दरडी कोसळलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)
>उष्णतेमुळे तडे गेल्याने दरडीचा धोका कायम
माझेरी व वाघजाई घाटातील डोंगर कड्याचा दगड हा बेसाल्ट प्रकारचा असून, या प्रकारच्या दगडावर सध्या पडणाऱ्या उष्णतेचा मोठा परिणाम होऊन या कड्यांना मोठ्या प्रमाणावर तडे गेल्यानेच या दरडी कोसळल्या आहेत. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर केला असून, या तड्यांमुळे येत्या पावसाळ्यात देखील या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे.
- अमृत पाटील,
शाखा अभियंता, सा.बां. महाड.

Web Title: Highway on my highway collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.