रेल्वे स्थानकातून महिलेचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2017 05:16 AM2017-02-08T05:16:38+5:302017-02-08T05:16:38+5:30
ऐरोली रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहणाऱ्या महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास वृद्ध महिलेसह ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली.
ठाणे : ऐरोली रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहणाऱ्या महिलेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमास वृद्ध महिलेसह ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. योगेश वसंत जाधव (४०) आणि किरण रवींद्र माळी (६१) अटक केलेल्या दोघांची नावे असून ते नवी मुंबईतील गोठिवलीचे रहिवाशी आहेत.
पिडीत ३५ वर्षीय महिला २९ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ऐरोली रेल्वे स्थानक क्रमांक २ येथे महिला जनरल डब्यासमोर वाशीकडे जाणाऱ्या लोकलची वाट पाहत उभी होती. याचदरम्यान,योगेश याने तिचे अपहरण करून माळी यांच्या घरी नेले. तेथे तिला जबदरस्तीने दारू पिण्यास देवून तिच्या अत्याचार केल्याची तक्रार पिडीत महिलेने नवी मुंबईतील ऐरोली पोलीस ठाण्यात केली होती. हा गुन्हा ३१ जानेवारी रोजी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्त निकेत कौशिक, पोलीस उपायुक्त समाधान पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकुमार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दळवी यांच्या पथकाने तपास सुरु केला. याचदरम्यान, पिडीत महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार, तेथील सीसीटिव्ही फु टेजमध्ये योगेश याची ओळख पुढे आले. तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या महिला अश्या दोघांना अटक केली. सध्या दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत. (प्रतिनिधी)