महाराष्ट्रात दर तासाला अपहरण

By admin | Published: September 13, 2016 04:02 AM2016-09-13T04:02:32+5:302016-09-13T04:02:32+5:30

सगळयात जास्त अपहरणे होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षी रोज जवळपास २३ म्हणजे तासाला एक अपहरणाचा गुन्हा नोंद होत होता.

Hijacking in Maharashtra every hour | महाराष्ट्रात दर तासाला अपहरण

महाराष्ट्रात दर तासाला अपहरण

Next

नितीन अग्रवाल ,  नवी दिल्ली
सगळयात जास्त अपहरणे होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश झाला आहे. गेल्या वर्षी रोज जवळपास २३ म्हणजे तासाला एक अपहरणाचा गुन्हा नोंद होत होता. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात गेल्या वर्षी (२०१५) अपहरणाच्या ८,२५५ घटना घडल्या.

राज्यात नोंदल्या गेलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये प्रत्येक चौथा किंवा पाचवा गुन्हा हा अपहरणाचा होता. गंभीर गुन्ह्याचे ३७,२९० प्रकरणे नोंद झाली. त्यात २२.१ गुन्हे अपहरणाचे होते. सगळयात जास्त अपहरणाचे गुन्हे (११,९९९) हे उत्तर प्रदेशात व त्यानंतर राजधानी दिल्लीत (७,७३०) नोंद झाले. त्यानंतरचा क्रमांक आहे बिहार (७,१२८) मध्य प्रदेश (६,.६७७८), पश्चिम बंगाल (६११५), आसाम (५,८३१),राजस्थान (५४२६) आणि हरियाना (३,५२०).

देशात अपहरणाचे एकूण गुन्हे ८२,९९९ नोंद झाले. त्यातील ३१,८२९ महिलांशी जबरदस्तीने विवाह करणे व ३,३३८ महिलांना अनैतिक संबंधांसाठी पळवून नेण्यात आले. अपहरण करणाऱ्यांमध्ये १,१८३ जणांना ठार मारण्यात आले तर १,२०३ जणांचे अपहरण बेकायदेशीर कारवायांसाठी केले गेले. खंडणीसाठी ७७४ तर ४३३ जणांचे सूड घेण्यासाठी पळवून नेण्यात आले.



राजधानी दिल्ली
अपहरणाच्या संख्येचा विचार केला, तर दिल्लीचे स्थान उत्तर प्रदेश व महाराष्ट्रानंतरचे, परंतु लोकसंख्येच्या तुलनेत येथे सगळ््यात जास्त अपहरणाचे गुन्हे नोंद झाले आहेत. एनसीआरबीच्या माहितीनुसार, दिल्लीत दर एक लाख व्यक्तिंमागे अपहरणाचे ३७ गुन्हे नोंदले गेले.


संपूर्ण देशात दर एक लाख लोकसंख्येमागे सरासरी ६.६ व्यक्ती अपरहणाच्या बळी ठरल्या. दिल्ली नंतर क्रमांक लागतो तो आसाम (१८.१), अरुणाचल (१३.४) चंदीगड (१३.२) आणि हरियाणा (१२.९) यांचा. सगळ््यात जास्त गुन्हे उत्तर प्रदेशात दर एक लाख लोकसंख्येमागे ५.६ आणि महाराष्ट्रात ६.९ लोकांचे अपहरण झाल्याची तक्रार होती.

Web Title: Hijacking in Maharashtra every hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.