हिमांशी कांकरिया यांना दीक्षा
By admin | Published: February 7, 2017 04:44 AM2017-02-07T04:44:23+5:302017-02-07T04:44:23+5:30
भजन-प्रवचन, मंत्रोच्चार अशा अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात राजस्थानातील नागोर येथील सु़श्री़हिमांशी कांकरिया यांना सोमवारी महासती इंदुबालाजी
जळगाव : भजन-प्रवचन, मंत्रोच्चार अशा अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात राजस्थानातील नागोर येथील सु़श्री़हिमांशी कांकरिया यांना सोमवारी महासती इंदुबालाजी म़सा़ यांच्या सानिध्यात जैन भगवती दीक्षा देण्यात आली. हजारो जळगावकरांनी हा अनोखा मंगलमय सोहळा याची देही, याची डोळा अनुभवला.
दीक्षा सोहळ््यानिमित्त सकाळी अभिविष्करण यात्रा काढण्यात आली. ही यात्रा स्वाध्याय भवनात पोहचल्यानंतर तेथे महासती इंदुबालाजी म़सा़, सुमतीप्रभाजी म.सा. यांच्या सेवेत हिमांशी कांकरिया यांनी क्षमायाचना केली व त्यानंतर वस्त्रपरिवर्तन व केशमुंडन होऊन महासती इंदुबालाजी म़सा़ यांच्या मुखाव्दारे जैन भगवती दीक्षा देण्यात आली.
मुदीतप्रभाजी म.सा., कानमुनीजी म.सा., रंजनाजी म.सा., सुशीलाकंवरजी म.सा. आदी उपस्थित होते. सर्व पाठ व धार्मिक विधीनंतर घर-परिवार यांचा त्याग होऊन हिमांशी कांकरिया या साध्वी झाल्या.
दीक्षा सोहळ््यास मुंबई येथील जैन समाजाचे राष्ट्रीय संयोजक मोफतराज मुणोद, चेन्नई येथील राष्ट्रीय अध्यक्ष पी़एस़सुराणा, उपाध्यक्ष महेंद्र कटारीया, जयपूर येथील माजी अध्यक्ष किसनचंद हिरावत, माजी मंत्री सुरेशदादा जैन, रतनलाल सी.बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, वर्धमान श्रावक संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)