हिंदी साहित्यिक पुणतांबेकर यांचे निधन
By Admin | Published: February 1, 2016 03:01 AM2016-02-01T03:01:09+5:302016-02-01T03:01:09+5:30
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि व्यंगकार डॉ. शंकर रघुनाथ पुणतांबेकर यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. कथा, समीक्षा, नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे.
जळगाव : ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि व्यंगकार डॉ. शंकर रघुनाथ पुणतांबेकर यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. कथा, समीक्षा, नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा आहे. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी व्यंग अमरकोशही लिहिला असून तो देशातील एकमेव व्यंगकोश ठरला. रावण तुम बाहर आओ, एक मंत्री स्वर्ग लोक में, कलंकरेखा, बिखरे पन्ने, जहाँ देवता मरते है आदी त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत. त्यांच्या ‘एक मंत्री स्वर्ग लोक में’ या रचनेवर सुमनकुमार यांनी ‘डेमोक्रॅसी इन हेवन’ हे नाटकसुद्धा रचले.
डॉ. पुणतांबेकर यांना विविध राष्ट्रीय पुरस्कारांसह हिंदी साहित्यातील अखिल भारतीय व्यंग चक्कलस हा मानाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. (प्रतिनिधी)