हिंदू -मुस्लिम ऐक्याची भाऊबीज

By admin | Published: November 3, 2016 03:04 AM2016-11-03T03:04:10+5:302016-11-03T03:04:10+5:30

जयदुर्गा मित्रमंडळातर्फे हिंदू महिलांना साडी व मिठाई भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मेमन यांनी ऐक्याचा संदेश देणारी भाऊबीज साजरी केली.

Hindu-Muslim brotherhood brother | हिंदू -मुस्लिम ऐक्याची भाऊबीज

हिंदू -मुस्लिम ऐक्याची भाऊबीज

Next


वाडा : तालुक्यातील घोणसई येथील जयदुर्गा मित्रमंडळातर्फे हिंदू महिलांना साडी व मिठाई भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते मुस्तफा मेमन यांनी ऐक्याचा संदेश देणारी भाऊबीज साजरी केली.
घोणसई मेट या ग्रामपंचायतीचे दिलीप पाटील हे माजी उपसरपंच आहेत. त्यांनी सामाजिक कार्यकर्ते व नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मुस्तफा मेमन यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. मुस्तफा यांनी या नावीन्यपूर्ण कल्पनेला होकार दिला. ते आले त्यांनी स्वत: साडी व मिठाई खरेदी करून आणली आणि स्वत:चे औक्षण करवून घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श ठेवला. या अनोख्या भाऊबीजेची भेट स्वीकारून महिलांनीही नवा पायंडा पाडला. विशेष म्हणजे या वेळी मुस्तफा यांंनी दिवाळी व भाऊबीज का साजरे करतात याची आख्यायिका रामायण महाभारताचे दाखले देऊन सांगितली.
या कार्यक्र मासाठी डॉ. गिरीश चौधरी, अशोक पाटील, दर्शना भोईर यांच्यासह गावातील महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र मातून पाहुण्यांनी यथोचित उद्बोधन केले. यावेळी उपस्थित तीनशेहून महिलांना भेट देऊन ऐक्याची अनोखी भाऊबीज करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनेश पाटील यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Hindu-Muslim brotherhood brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.