हिंदू-मुस्लीम नव्हे, 'त्या' हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात: रविकांत तुपकर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 11:35 AM2020-02-08T11:35:14+5:302020-02-08T12:04:08+5:30
सत्तेत आल्यावर मोदी यांनी किती शेतकऱ्यांच्या मुलांना नौकऱ्या दिल्या असा प्रश्न तुपकरयांनी यावेळी उपस्थित केला.
मुंबई : निवडणुका येताच राजकीय नेत्यांकडून तुमचा धर्म संकटात असल्याचा प्रचार केला जातो. मात्र प्रत्यक्षात ना हिंदू संकटात आहे, ना मुस्लीम धोक्यात आहे. मात्र या हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात असल्याचं वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी केलं आहे. जळगांव जामोद येथे क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना तुपकर म्हणाले की, दिल्लीतून कुणीतरी म्हणतो हिंदू अडचणीत आहे. तर लगेच मुंबईतून दुसर कुणीतरी म्हणतो मुस्लीम धोक्यात आहे. मात्र आम्ही सर्व एकाच हॉटेलमध्ये सोबत जेवेतो,सोबत राहतो. तर दोन्ही समाजातील लोकं एकमेकांच्या सणाला हजेरी लावतात. त्यामुळे ना हिंदू संकटात आहे, ना मुस्लीम धोक्यात आहे. परंतु या हरामखोरांच्या खुर्च्या धोक्यात असल्याचं तुपकर म्हणाले.
तर पुढे बोलतानी त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सुद्धा टीका केली. भाजपने लोकांना मोठ-मोठी स्वप्न दाखवली. शेतकरी आत्महत्या थांबवू आणि त्यांना दीडपट भाव देण्याचे आश्वासन देण्यात आले. मोदी यांनी निवडणुकीच्या काळात आपल्या भाषणातून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेत आल्यावर मोदी यांनी किती शेतकऱ्यांच्या मुलांना नौकऱ्या दिल्या असा प्रश्न तुपकर यांनी यावेळी उपस्थित केला.