Hinganghat Burn Case: काँग्रेस नेत्याची अहिंसेची 'शिकवण'; 'कठोर कायद्यानेही नराधम थांबले नाहीत, त्याऐवजी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 05:06 PM2020-02-10T17:06:55+5:302020-02-10T17:08:50+5:30

निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत.

Hinganghat Burn Case: Congress leader teaches non-violence; 'Strict laws did not stop women harassment, but instead ... | Hinganghat Burn Case: काँग्रेस नेत्याची अहिंसेची 'शिकवण'; 'कठोर कायद्यानेही नराधम थांबले नाहीत, त्याऐवजी...

Hinganghat Burn Case: काँग्रेस नेत्याची अहिंसेची 'शिकवण'; 'कठोर कायद्यानेही नराधम थांबले नाहीत, त्याऐवजी...

Next
ठळक मुद्दे कडक व तीव्र गतीने शासन देण्याबरोबरच समाजातील हिंसेचे चक्र मोडले पाहिजेहिंसक वक्तव्ये वा पक्षीय धोरणे ही कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजेनिर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत

मुंबई - हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त होऊ लागली आहे. या घटनेला आरोपीला फाशावर लटकवा अशी तीव्र मागणी लोकांकडून होत आहे. यातच काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत. समाजातील हिंसेचे चक्र मोडून काढण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. 

याबाबत सचिन सावंत यांनी ट्विट करुन सांगितले की, प्रत्येकवेळी हिंगणघाट सारखी घटना होते त्यावेळी तात्काळ कडक शासन, फाशीची शिक्षा वा एन्काऊंटर सारख्या मागण्या आपण करतो. निर्भयाच्या बलात्कार व निघृण हत्येनंतर निर्भया सारखा कायदा आणूनही असे नराधम थांबले नाहीत. कडक व तीव्र गतीने शासन देण्याबरोबरच समाजातील हिंसेचे चक्र मोडले पाहिजे असं ते म्हणाले 

त्याचसोबत करुणा, प्रेम, परस्परादर, सद्भावना व अहिंसा यांची शिकवण अभ्यासक्रम व सामाजिक चळवळीतून दिली गेली पाहिजे. राजकीय प्रक्रियेतून येणारी हिंसक वक्तव्ये वा पक्षीय धोरणे ही कायद्याच्या चौकटीत आणली पाहिजे. चांगला नागरिक बनण्यासाठी गांधीजींकडेच व अध्यात्मिक प्रगतीमध्ये याचा उपाय आहे अशी मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. 

हिंगणघाट प्रकरणातील पीडिता गेल्या 7 दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होती. तिला सात फेब्रुवारीला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तेव्हापासूनची तिची प्रकृती चिंताजनक होती. मात्र तिचा रक्तदाब खालावत गेला. त्यामुळे डॉक्टरांसह सर्वांची धाकधूक वाढली होती. तिला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी हरतऱ्हेचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. तिच्या त्वचेला गंभीर इजा झाल्यानं जंतूसंसर्ग वाढत गेला आणि आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिने अखेरचा श्वास घेतला.

...त्यापेक्षा तुला 'निर्भया' नाव ठेवणं आम्हाला सोयीचं वाटतं; शालिनी ठाकरेंचं उपरोधिक पत्र

दरम्यान, या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत. या भगिनीच्या कुटुंबियांची व दारोडा गावातील लोकांची मानसिक अवस्था आपण  समजू शकतो. महाराष्ट्राला पुरोगामी परंपरा आहे. माता- भगिनींचा सन्मान करणारा प्रदेश म्हणून आपली ओळख आहे. या प्रतिमेला तडा देणाऱ्या या गोष्टींना कदापिही खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

आज ती जळाली नाही समाज व्यवस्थेचा बुरखा जळाला"

अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

 'त्या' नराधमाला कडक शिक्षा होईल : जयंत पाटील

"ताई तुझ्या न्याय हक्कांच्या लढाईसाठी महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे"

Web Title: Hinganghat Burn Case: Congress leader teaches non-violence; 'Strict laws did not stop women harassment, but instead ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.