Hinganghat Burn Case : अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2020 02:23 PM2020-02-10T14:23:45+5:302020-02-10T14:31:08+5:30

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे.

Hinganghat Burn Case: guilty should be hanged immediately - Amruta Fadnavis | Hinganghat Burn Case : अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

Hinganghat Burn Case : अपराध्याला त्वरित फाशी व्हावी- अमृता फडणवीस 

Next

मुंबई : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची सात दिवसानंतर मृत्यूची झुंज आज अपयशी ठरली. नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी ६.५५ मिनिटांनी पीडितेनं अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे. अमृता फडणवीस याबाबत ट्विट केले आहे. त्या म्हणाल्या, "प्रार्थना! ती आपली सर्वांची, महाराष्ट्राची, देशाची कन्या होती! अपराध्याला त्वरित फाशी व्हावी." दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट करून पीडितेच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी पार्थना केली आहे. ते म्हणाले, "हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. तिच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्यासाठी शक्ती मिळावी, यासाठी मी प्रार्थना करतो."

याचबरोबर, 'आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल. असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असा कायदा करू. हैदराबादपेक्षा कडक कायदा करू. नागरिकांनी संयम बाळगा' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच 'हिंगणघाट येथे घडलेली घटना महाराष्ट्रासाठी अश्लाघ्य अशीच आहे. विकृत हल्ल्यात जखमी भगिनी मृत्युशी झुंजत होती. उपचारांचीही शर्थ केली. पण काळाने घाला घातलाच. या गुन्ह्याचा तपास जलद गतीने होईल आणि खटला जलद गतीने चालविण्याची निर्देश देण्यात आले आहेत' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. 

गेल्या सोमवारी वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये एका तरूण शिक्षिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. नंदोरी मार्गावरील महालक्ष्मी किराणा दुकानासमोर हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणातील आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली. 

या पीडित तरुणीसाठी संपूर्ण राज्यातून प्रार्थना सुरू होत्या. डॉक्टर तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते. मात्र, तिची प्रकृती सुरुवातीपासूनच चिंताजनक होती. 7 फेब्रुवारीला तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तिला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही आणि अखेर तिची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. 

महत्त्वाच्या बातम्या

Breaking : SC/ST अ‍ॅक्ट: अटकेसाठी चौकशीची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Hinganghat Burn Case : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार - अनिल देशमुख

हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे

'मुलीच्या मारेकऱ्याला आमच्या स्वाधीन करा, जिवंत जाळा', पीडितेच्या वडिलांचा संताप

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

Web Title: Hinganghat Burn Case: guilty should be hanged immediately - Amruta Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.