हिंगोलीत भीषण अपघात :7 ठार, 14 गंभीर जखमी

By admin | Published: April 2, 2017 11:16 AM2017-04-02T11:16:46+5:302017-04-02T13:35:20+5:30

खासगी ट्रॅव्हल्स व दुचाकी भरलेल्या ट्रकचा आज सकाळी 9:30 वाजता समोरासमोर भीषण अपघात झाला

Hingoli accidental accident: 7 dead, 14 seriously injured | हिंगोलीत भीषण अपघात :7 ठार, 14 गंभीर जखमी

हिंगोलीत भीषण अपघात :7 ठार, 14 गंभीर जखमी

Next
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 2 - हिंगोली - नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पार्डी मोड जवळ उभ्या खासगी बसवर ट्रक धडकून झालेल्या अपघात सात ठार तर चौदा गंभीर झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता घडली. 
लक्झरी बस क्रमांक एम. एच. ३८ एफ. ५७८६ ही नांदेडून हिंगोलीकडे येत होती. तर ट्रक क्रमांक एन. एल. ०१ क्यू ३७५७ हा भरधाव वेगाने नांदेडमार्गे जात होता. लक्झरीबस प्रवासी उतरविण्यासाठी थांबली होती. दरम्यान समोर वळणावरुन येणाºया भरधाव  ट्रकने लक्झरीस जोराची धडक दिली. यात एकबाल साहेब खॉ पठाण (२५ सावरगाव ता. पुसद ) , सुत्यभामाबाई गंगाधर डुकरे (२५ रा. माळसरा ता. हदगाव ), अरुणा रंगराव पांढरे (२० रा. मोरवड ता. कळमनुरी), भीमराव श्रावण कांबळे (२२ रा.भाटेगाव), सीमा भीमराव कांबळे (२६ रा. भाटेगाव ) अराध्या भीमराव कांबळे (२ वर्ष भाटेगाव ) या सहा प्रवाशांचा जाग्यावरच मृत्यू झाला. तर मुरहरी सुभान गोलर (६० रा. अर्धापूर) मिलींद मुरहरी गोलर (३१ अर्धापूर) रंगराव रामजी पांढरे (६० मोरवड) म. असलम इब्राहीम (३२ हरीयाना) मंगेश सुधाकर साखरे (२२ सावरगाव ) गंगाधर गोपाळराव देशमुख (३५घोडा) हे सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीना हिंगोली व नांदेड येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर सचीन विठ्ठल देशमुख (२५ बाभळी ता. कळमनुरी) संदीप शंकरराव सूर्यवंशी (२२ बाभळी) निर्गुण राजेंद्र सूर्यवंशी (२० बाभळी), सोपान बालाजी सूर्यवंशी (१९ बाभळी) गोपीनाथ मारोती राठोड (२८ आ. बाळापूर) सपना गंगाधर देशमुख (२५ रा. घोडा), अनुराग गंगाधर देशमुख (३ वर्ष घोडा), करीम खान नसीब खान (२५ रा. सावरगाव) हे आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या जखमीवर कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. लोणीकर, दुर्गे, फरीदा गोहर, मेने, पंचलिंगे, खान आदींनी उपचार केले. घटनेची माहिती मिळताच पोनि. कुंदनकुमार वाघमारे, सपोनि सुधाकर आडे, फौजदार पठाण, प्रेमलता गोमाशे, खंदारे, सिद्दीकी, कपाटे, घोगरे, वसीम आदीनी धाव घेतली व जखमीना रुग्णालयात दाखल केले.
 
वाहकाची परीक्षा देऊन परतले होते चौघे-
कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथील सचीन देशमुख, संदीप सूर्यवंशी, निर्गुण सूर्यवंशी, सोपान सूर्यवंशी हे चौघे औरंगाबाद येथून वाहकाची परीक्षा देऊन बाभळी येथे जाण्यासाठी खासगी बसने परतत असताना चौघेही जखमी झाले आहेत. काही क्षणातच दोन्हीही वाहने समोरा- समोर भिडली व अपघात झाला व एकच आराडा ओरड झाला. वाहनातून बाहेर येत नसल्याने प्रवासी आक्रोश करीत होते. त्यामुळे रस्त्यावरुन जाणारे वाहन धारक वाहने उभी करुन जखमीना बाहेर काढण्यासाठी मदत करीत होते. हा अपघात एवढा भयंकर होता कही मयत चिमुकलीच्या मानेचा लचकाच तुटून गेला होता. तर इतरही प्रवाशांना लागलेल्या मारामुळे  बस मधून रक्तांचे लोट निघत होते. बसमधील खुर्च्यांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला होता. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हात पाय या मध्ये अडकले होते. त्याना बाहेर निघणे शक्य नसलले प्रवासी मदतीसाठी मागणी करीत होते. एका जखमीला नांदेड ला उपचारासाठी नेताना त्याचा रस्त्यातच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयत व जखमीना पाहण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात बघ्यांची एकच गर्दी झाली होती. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ भेट देऊन पाहणी केली.    
 

Web Title: Hingoli accidental accident: 7 dead, 14 seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.