हिंगोलीत ‘ती’ युती जनतेने नाकारली
By Admin | Published: June 21, 2016 03:52 AM2016-06-21T03:52:58+5:302016-06-21T03:52:58+5:30
वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून वावरणाऱ्या मंडळींनी केलेली अभद्र युती जनतेने नाकारली.
हिंगोली : वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून वावरणाऱ्या मंडळींनी केलेली अभद्र युती जनतेने नाकारली. सभासदांनी अॅड. शिवाजी जाधव यांच्यावर विश्वास दाखविला.
कायम विरोधक राहिलेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व शिवसेनेचे माजी मंत्री तथा आ. जयप्रकाश मुंदडा यांनी या साखर कारखान्याच्या निवडणुकीत हातमिळविणी केली होती. त्यातच तालुक्याच्या राजकारणात राजकीय दबावगट तयार करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यात तरबेज असलेली शंकरराव खराटे, निरंजन पाटील इंगोले, मुंजाजीराव इंगोले आदी मंडळीही यावेळी मुंदडा-दांडेगावकर यांच्या वळचणीला जाऊन बसली होती. (प्रतिनिधी)