हिंगोलीत भाजपा-एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; सहा जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 04:15 PM2018-11-03T16:15:23+5:302018-11-03T16:18:54+5:30
हिंगोलीत असलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
हिंगोली : हिंगोलीत असलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेशन दुकानाची चौकशी करण्यासाठी हिंगोली तहसीलचे एक पथक गारमाळमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी तहसील पथकाचा पंचनामा सुरु असताना तहसील कर्मचाऱ्याला मारहाण झाली. यानंतर भाजपा कार्यकर्ते हमीद प्यारेवाले आणि एमआयएम जिल्हाध्यक्ष शेख बुऱ्हाण पहेलवान गटात तणाव निर्माण झाला. भाजपा आणि एमआयएमचे कार्यकर्ते एकमेकांशी परस्पर भिडले. तसेच, दोन्ही गटांत लाठ्या-काठ्यांसह तुंबळ हाणामारीला झाली. याशिवाय दगडफेक सुद्धा करण्यात आली.
दरम्यान, या घटनेत 115 जण जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच, गारमाळ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.