मुस्लिम समाजाचा हिंगोलीत भव्य मोर्चा
By admin | Published: October 18, 2016 06:01 PM2016-10-18T18:01:03+5:302016-10-18T18:01:03+5:30
आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजानेही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून तब्बल तीन तास जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. तसेच विविध प्रकारच्या घोषणा
Next
>ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 18 - आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लिम समाजानेही शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून तब्बल तीन तास जिल्हा कचेरीसमोर धरणे दिले. तसेच विविध प्रकारच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यात विविध भागातून आलेले मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शरियतमध्ये शासनाने दखलंदाजी करू नये, एक्सा सिव्हील कोर्ट लागू करू नये, समान नागरी कायदा लागू कर नये आदी मागण्यांसदर्भात मोर्चातील प्रमुखांनी भाषणे केली. धर्मगुरुंच्या नेतृत्वात हा समाज एकवटला होता. मुस्लिम समाजातील विविध पक्षात असलेल्या पुढा-यांचा मोर्चात सहभाग असला तरीही अगदी सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनी धरणे दिले.
मेहराजुल उलूम चौक येथून अगदी शिस्तीत हा मोर्चा निघाला. गांधी चौक, इंदिरा गांधी चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १२.३0 च्या धडकला. तेथे मुस्मिल बांधवांनी धरणे देत समाजातील मान्यवरांनी समुदायाला मार्गदर्शन केले. यात मान्यवरांनी समाजाला आरक्षणाची असलेली गरज प्रकट करीत शरियतमध्ये दखलंदाजी करू नये, समान नागरि कायदा लागू करू नये आदी मागण्या केल्या. मोर्चात अबालवृद्ध सहभागी झाले होते. रणरणत्या उन्हातही तीन तास जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. समाजातील नागरिकांनी पाणीपाऊचचे वाटप केले. तसेच काही संघटनांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. शेवटी काही मुलांच्या हस्ते जमियत उलेमा-ए-हिंद जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.