हिरकणी आरामदायी

By admin | Published: June 26, 2015 02:51 AM2015-06-26T02:51:46+5:302015-06-26T02:51:46+5:30

प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुकर होण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणीच्या (निम आराम) सीटमध्ये (आसन) बदल केला आहे

Hirakani is comfortable | हिरकणी आरामदायी

हिरकणी आरामदायी

Next

मुंबई : प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुकर होण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणीच्या (निम आराम) सीटमध्ये (आसन) बदल केला आहे. या बसमध्ये नव्याने ‘पुशबॅक सीट’ बसवण्यात आल्या असून या सीटमुळे प्रवाशांचा विकास अधिक आरामदायी होणार आहे. परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते नव्या हिरकणी बसना दादर येथे गुरुवारी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मात्र पुशबॅक सीटमुळे हिरकणी बसमधील चार सीटची कपात होणार आहे.
सध्या एसटी महामंडळाकडे ९५0 हिरकणी बस आहेत. या सर्व बसेस लांब पल्ल्याच्या मार्गावर असल्याने यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठी महामंडळाने या बसमधील सीटच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला. अशा १५ हिरकणी बसेस ताफ्यात दाखल झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सहा महिन्यांत अशा प्रकारच्या तब्बल ५00 बसेस दाखल होणार आहेत. मात्र ‘पुशबॅक सीट’ आसन केल्यामुळे हिरकणीमधील सीटची क्षमता ही ३९ वरुन ३५ वर होणार आहे.

Web Title: Hirakani is comfortable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.