११ लाख भाविक विठुचरणी लीन
By admin | Published: August 2, 2015 03:04 AM2015-08-02T03:04:04+5:302015-08-02T03:04:04+5:30
आषाढी सोहळ््याच्या केवळ १२ दिवसांत ११ लाख ४ हजार भाविक विठुचरणी लीन झाले. तर, अधिक मासात १२ लाख ८२ हजार ४५१ भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.
- सचिन कांबळे, पंढरपूर
आषाढी सोहळ््याच्या केवळ १२ दिवसांत ११ लाख ४ हजार भाविक विठुचरणी लीन झाले. तर, अधिक मासात १२ लाख ८२ हजार ४५१ भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले.
यंदा आषाढी यात्रेपूर्वी अधिक मासाचा योग आला होता. यामुळे या कालावधीमध्ये शहरात रोज किमान ३५ ते ५० हजार भाविक विठ्ठलाचे दर्शन घेत असत.
अधिक मासात पदस्पर्श ८ लाख ९६ हजार ५०२ तर मुखदर्शन ३ लाख ८५ हजार ९४९ अशा एकूण १२ लाख ८२ हजार भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
आषाढी यात्रेच्या १८ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये ६ लाख ७१ हजार ६३४ भाविकांनी पदस्पर्श व ४ लाख ३२ हजार ८२१ भाविकांनी मुखदर्शन असे एकूण ११ लाख ४ हजार ४५५ भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
आषाढीपूर्वीची
कमला एकादशी
आषाढी यात्रेच्या सोहळ्यापूर्वीची एकादशी कमला एकादशी होती. या एकादशी दिवशी ५४ हजार २८० भाविकांनी दर्शन घेतले. यामध्ये ३६ हजार ७४१ भाविकांनी पदस्पर्श तर १७ हजार ५३९ भाविकांनी मुखदर्शन घेतले.