...अन् त्याचे पीएसआय बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 11:12 AM2021-08-06T11:12:26+5:302021-08-06T11:12:53+5:30

Maharashtra News:  एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आंबा येथे घडली.

... His dream of becoming a PSI remained unfulfilled | ...अन् त्याचे पीएसआय बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

...अन् त्याचे पीएसआय बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले

googlenewsNext

आंबा (जि. जालना) :  एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास आंबा येथे घडली. अशोक सोनाजी घुले (३०) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. अशोकला पीएसआय व्हायचे होते; परंतु त्याच्या मृत्यूने हे स्वप्न अधुरेच राहिले आहे.      
अशोक घुले हा गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद येथे एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता. त्याला पोलीस उपनिरीक्षक बनायचे होते. काही दिवसांवर एमपीएससीची परीक्षा आली होती; परंतु गतवर्षीप्रमाणेच यंदाही परीक्षा रद्द होो की काय, याची चिंता त्याला होती.  दोन दिवसांपूर्वीच अशोक हा आंबा येथे आला होता.  बुधवारी आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी तो शेतात गेला. चार वाजेच्या सुुमारास त्याच्या छातीत दुखू लागले. तो एका झाडाखाली बसला असता, त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे घुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.  अशोकचे पीएसआय बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: ... His dream of becoming a PSI remained unfulfilled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.