सारथी संस्था बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आम्ही ते हाणून पाडले : युवराज संभाजीराजे छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 06:14 PM2020-07-06T18:14:00+5:302020-07-06T18:26:49+5:30

प्रत्येक जात आणि धर्माचा आदर व्हायला हवा...

History of Chhatrapati Shahu Maharaj should be included in the syllabus: Yuvraj SambhajiRaje Chhatrapati | सारथी संस्था बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आम्ही ते हाणून पाडले : युवराज संभाजीराजे छत्रपती

सारथी संस्था बंद पाडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण आम्ही ते हाणून पाडले : युवराज संभाजीराजे छत्रपती

googlenewsNext
ठळक मुद्देमराठा सरदार परिषदेचे ऑनलाईन उद्घाटन

पुणे : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी राहिली आहे. ती बंद पडण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते करु दिले नाहीत. गरिबातील गरीब मराठा समाज यातून उभा राहणार आहे. फेलोशिप आणि स्कॉलरशीप सारथीच्या माध्यमातून मिळत असून त्याचा फायदा अनेकांना होत आहे, असे मत असल्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले. 

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आणि मराठा साम्राज्यात योगदान दिलेल्या सरदारांच्या घराण्याचे वंशज यांची मराठा सरदार परिषद ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. ओंकार कोंढाळकर, अनिकेत कोंडे यांनी ऑनलाईन परिषदेचे आयोजन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इयत्ता ४ थी च्या पाठ्यपुस्तकात धडा आहे. त्याप्रमाणेच राजर्षी शाहू महाराज यांच्या इतिहासाचा देखील शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा यासाठी त्वरीत पत्रव्यवहार सुरु करु, असे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. इयत्ता ४ थी च्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराज यांचा धडा आहे त्याचप्रमाणे मुलांना समजेल अशा ९ वी ते १२ वी पर्यंत च्या अभ्यासक्रमात देखील शिवाजी महाराज, शाहू महाराज, तारा राणी यांचा इतिहास सांगणारे धडे हवेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. किल्यांचे संवर्धन आणि जतन याविषयी सांगताना ते पुढे म्हणाले, रायगड प्राधिकरण मॉडेल प्रमाणे इतर किल्यांचे संवर्धन व्हायला हवे. यासाठी काम सुरु आहे. फोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून किल्ले आणि सरदारांचे जुने वाडे यांचे जतन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. अनेक ठिकाणी मराठ्यांची वाईट परिस्थिती आहे.  माझा लढा मराठा म्हणून नाही तर अठरा पगड जात आणि बारा बलुतेदारांना जोडण्यासाठी होता. प्रत्येक जात आणि धर्माचा आदर व्हायला हवा. असेही ते म्हणाले. .... 

.........................

तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहा

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी राहिली आहे. ती बंद पडण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते करु दिले नाहीत. गरिबातील गरीब मराठा समाज यातून उभा राहणार आहे. फेलोशिप आणि स्कॉलरशीप सारथीच्या माध्यमातून मिळत असल्याचेही युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. ... 

Web Title: History of Chhatrapati Shahu Maharaj should be included in the syllabus: Yuvraj SambhajiRaje Chhatrapati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.