कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात घडविला इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2016 08:25 PM2016-10-16T20:25:19+5:302016-10-16T23:03:48+5:30
भविष्यात उर्जेची कमतरता टाळण्यासाठी आजच वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वत्रिकरित्या एक तास वीज बंद ठेवण्याचे आवाहन
Next
id="yui_3_16_0_ym19_1_1476625571181_10739">ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - भविष्यात उर्जेची कमतरता टाळण्यासाठी आजच वीज वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वत्रिकरित्या एक तास वीज बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा येथील गावक-यांनी कोजागिरीच्या रात्री चंद्राच्या लख्ख प्रकाशात इतिहास घडविला. एक तास वीज बंद ठेवून वीज बचतीचा संकल्प करणारे रोंघा हे देशातील पहिले गाव ठरले.
आमदार अनिल सोले यांनी एक वर्षापूर्वी रोंघा हे गाव दत्तक घेतले होते. त्यानंतर त्यांनी गावक-यांच्या पुढाकाराने विविध विकासाची कामे राबविली. एक तास वीज बंद ठेवण्याची संकल्पना त्यांनी गावासमोर मांडली तेव्हा ग्रामस्थांनीही त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यासाठी कोजागिरीचा दिवस निश्चित करण्यात आला. ग्रामीण क्षेत्रात भारनियमनाचा प्रकार नेहमीच अनुभवायला मिळतो. मात्र येथे गावकºयांनी स्व:खुशीने एक तास विज बंद ठेवण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे या नवीन उपक्रमाची उत्सुकता गावकºयांमध्ये होती. सकाळी गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सरपंच विजय परतेती, उपसरपंच देवराव भोंडे व ग्रामपंचायत सदस्यांच्या पुढाकाराने विविध कार्यक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन दिवसभर करण्यात आले होते. ग्रामस्थांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.
रात्री बरोबर ८ वाजता गावातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र नेहमी विज पुरवठा बंद होण्यापेक्षा हा अनुभव वेगळा होता. बाहेर कोजागिरीच्या चंद्राचा लख्ख प्रकाश पडला होता. विशेष म्हणजे या चंद्रप्रकाशात सुईत धागा रोवण्याची आणि महिलांसाठी रांगोळी काढण्याची स्पर्धा या वेळी घेण्यात आली. या स्पर्धांमुळे वीज बचतीच्या संकल्पाला आणखी उत्साह आला. एक तासानंतर रात्री ९ वाजता पुन्हा गावातील वीज सुरु करण्यात आल