शितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 02:14 AM2017-09-22T02:14:14+5:302017-09-22T02:14:16+5:30

माहीम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इ. स. १८९० ते १८९५ च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली.

History of Shitaladevi Temple, Twenty-three-year history, well-used use of wells | शितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग

शितळादेवी मंदिराला सव्वाशे वर्षांचा इतिहास, विहिरीचा असाही उपयोग

googlenewsNext

अक्षय चोरगे 
मुंबई : माहीम येथील शितळादेवी मंदिर हे मुंबईतील देवीच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. इ. स. १८९० ते १८९५ च्या दरम्यान स्थानिक कोळी बांधवांनी या मंदिराची स्थापना केली. मंदिर उभारल्यानंतर काही वर्षांनी आसपासची जमीन जी.एस.बी. मंदिर ट्रस्टने खरेदी केली आणि तेव्हापासून मंदिर ट्रस्टकडे आहे.
कोळी बांधवांसह मंदिरात बंगाली बांधव मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. तर सिंधी बांधव दसºयाच्या दिवशी लहान मुलांचे जायवळ काढण्यासाठी येतात. म्हणूनच शितळादेवी मंदिरात दसºयाला मोठी गर्दी असते. कोळी समाजातील कुटुंबात जन्माला आलेल्या मुलाला शितळादेवीच्या पायावर ठेवण्याची प्रथा आहे.
देवीच्या दर्शनासाठी मंदिरात
रांगा लागल्या, तरी योग्य नियोजनामुळे कोणत्याही प्रकारची धक्काबुक्की होत नाही. सुरक्षेसाठी येथे पूर्णवेळ पहारेकरी आहेत. महाराष्ट्र
पर्यटन विकास महामंडळातर्फे नवरात्रौत्सवादरम्यान मुंबईतील ज्या पाच मंदिरांचे दर्शन घडवले जाते, त्यातील एक म्हणजे शितळादेवी मंदिर. मंदिराचे आणि देवीचे नाव शितळादेवी आहे. परंतु लोकांनी त्याचा अपभं्रश करून शितलादेवी असे केले आहे, असे जुन्या जाणत्या व्यक्तींनी सांगितले. शितळादेवीची मूर्ती ही स्वयंभू आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. देवीसाठी सोन्याचा मुलामा दिलेला
मुखवटा आहे.
खोकला बरा करणारी खोकलादेवी
शितळादेवी मंदिर परिसरात खोकलादेवीचेही एक प्रसिद्ध मंदिर आहे. खोकलादेवीचे दर्शन घेतल्यावर खोकल्याचा आजार बरा होतो अशी लोकांची श्रद्धा आहे.
>मंदिराच्या शेजारी एक जुनी विहीर आहे. कोळी बांधवांच्या घरी लग्नकार्य असेल तर शुभ शकुन म्हणून या विहिरीतील पाणी नेतात. नवरदेवाच्या आंघोळीसाठीसुद्धा या विहिरीचे पाणी नेले जाते. विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे, मात्र पालिकेने सर्व घरांमध्ये नळांची सुविधा दिल्याने विहिरीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर होत नाही.
>मंदिरातील उत्सव
मंदिरात अश्विन महिन्यात घटस्थापनेपासून दसºयापर्यंत दहा दिवस शारदोत्सव (नवरात्रौत्सव) साजरा केला जातो. तर माघ महिन्यात पहिल्या दिवसापासून ते दहाव्या दिवसापर्यंत माघी शारदोत्सव (माघी नवरात्रौत्सव) साजरा केला जातो. कुमारिका पूजन, पालखी सोहळा हे त्यापैकी मोठे सोहळे आहेत. या काळात दररोज सात हजारांहून अधिक भाविक दर्शनाला येतात.

Web Title: History of Shitaladevi Temple, Twenty-three-year history, well-used use of wells

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.