‘तो’ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये देतोय बारावीची परीक्षा

By admin | Published: February 23, 2015 11:18 PM2015-02-23T23:18:18+5:302015-02-23T23:59:07+5:30

कऱ्हाडच्या जिद्दी तरुणाची कहाणी : परीक्षेच्या दोन दिवस आधी हृदयविकाराचा धक्का

'HM' in the ambulance is the HSC exam | ‘तो’ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये देतोय बारावीची परीक्षा

‘तो’ अ‍ॅम्ब्युलन्समध्ये देतोय बारावीची परीक्षा

Next

कऱ्हाड : बारावीची परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा; पण याच टप्प्यावर एखादी अनुचित घटना घडली तर..! असाच काहीसा प्रकार कऱ्हाडातील नितीन चव्हाण या विद्यार्थ्याबाबत घडला. परीक्षेच्या दोन दिवसांपूर्वी नितीनला हृदयविकाराचा झटका आला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण परिस्थितीसमोर हार न मानता नितीनने महाविद्यालयाच्या आवारात अ‍ॅम्ब्युलन्समध्ये बसून बारावीचा पेपर दिला.कऱ्हाडच्या गाडगे महाराज महाविद्यालयाचा विद्यार्थी नितीन संजय चव्हाण याने बारावी परीक्षेसाठी तयारी केलेली. त्याचा अभ्यासही पूर्ण होत आलेला. मात्र, अशातच १८ फेब्रुवारीला रात्री झोपेतच नितीनला हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावे लागले. शहरातील एका नामांकित रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात नितीनवर उपचार सुरू झाले. नितीन मृत्यूशी झुंज देत होता. दुसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला खरा; पण त्याने बारावीची परीक्षा देण्याची इच्छा बोलून दाखविली. त्यावेळी कुटुंबीयांनाही अश्रू अनावर झाले. कुटुंबीयांनी त्याची समजूत घातली. मात्र, तरीही नितीन परीक्षा देण्याच्या इच्छा बोलून दाखवत होता. अखेर याबाबत डॉक्टरांशी चर्चा करून कुटुंबीयांनी नितीनला पेपरसाठी अ‍ॅम्ब्युलन्समधून महाविद्यालयात नेण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनीही त्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार शनिवारी महाविद्यालयाच्या आवारात थांबविण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतच नितीनने बारावीचा पहिला पेपर दिला. सर्व पेपर नितीन अशाच पद्धतीने देणार आहे. त्याला ज्या रुग्णवाहिकेतून महाविद्यालयात नेले जाते त्यात अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत. मात्र, रुग्णवाहिकेचा चार तासांचा खर्च पाच हजार रुपये आहे. प्रत्येक पेपरसाठी पाच हजार रुपये भरण्याची तयारी नितीनला पालकांनी दाखविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'HM' in the ambulance is the HSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.