हॉकी खेळाडू शासनाकडून उपेक्षित! यवतमाळच्या आकाशची व्यथा; लष्कराने केला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:34 AM2017-12-18T02:34:10+5:302017-12-18T02:34:29+5:30
आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार मिळणाºया कोणत्याही सुविधा त्याला मिळाल्या नाहीत. एवढेच काय, जिल्हा क्रीडा कार्यालयाने त्याच्या साध्या सत्काराचेही सौजन्य दाखविले नाही.
नीलेश भगत
यवतमाळ : आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार मिळणाºया कोणत्याही सुविधा त्याला मिळाल्या नाहीत. एवढेच काय, जिल्हा क्रीडा कार्यालयाने त्याच्या साध्या सत्काराचेही सौजन्य दाखविले नाही.
यवतमाळ येथील आकाश चिकटे हा लष्करात नायब सुभेदार पदावर कार्यरत आहे. हॉकीचा अव्वल दर्जाचा खेळाडू असलेला आकाश भारतीय संघासाठी गोलरक्षक म्हणून खेळतो. त्याच्या खेळासाठी भारतीय लष्कराने त्याला शिपाईपदापासून थेट नायब सुभेदारपदापर्यंत बढती दिली. लष्कराने त्याच्या क्रीडा कौशल्याचा यथोचित गौरव केला. मात्र, महाराष्ट्र शासनाने अद्यापही त्याची दखल घेतली नाही.
शुक्रवारी यवतमाळात आल्यानंतर आकाश चिकटेने ‘लोकमत’शी बोलताना खंत व्यक्त केली. विशेष म्हणजे, २०१२ च्या राज्य क्रीडा धोरणाप्रमाणे आशिया कप विजेत्या खेळाडूंना दहा लाख रुपये रोख पुरस्कार देण्याची तरतूद आहे. आंतरराष्टÑीय पदक विजेत्या खेळाडूंना सराव शिबिर, व्यक्तिगत विदेशी कोचचे मार्गदर्शन, क्रीडा साहित्य खरेदी, मोठ्या शहरात फ्लॅट अथवा जमीन अशा सुविधा देण्याची तरतूद आहे. मात्र, आकाश चिकटेला राज्य शासनाने सात लाख ५० हजार रुपयांच्या बक्षिसाव्यतिरिक्त कोणतीही सुविधा दिली नाही. ही सुविधाही दीड वर्षापूर्वीची आहे.