बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प ताब्यात घ्या

By admin | Published: February 24, 2016 01:04 AM2016-02-24T01:04:04+5:302016-02-24T01:04:04+5:30

राज्यात एकीकडे पाणीटंचाई असतांना दुसरीकडे बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा राजरोस चालू आहे. पाण्याची दुप्पट तिप्पट दराने विक्री करून जनतेची लुट आहे. त्यामुळे बाटली बंद पाण्याचे प्रकल्प

Hold the bottled water project | बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प ताब्यात घ्या

बाटलीबंद पाण्याचे प्रकल्प ताब्यात घ्या

Next

मुंबई : राज्यात एकीकडे पाणीटंचाई असतांना दुसरीकडे बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा राजरोस चालू आहे. पाण्याची दुप्पट तिप्पट दराने विक्री करून जनतेची लुट आहे. त्यामुळे बाटली बंद पाण्याचे प्रकल्प शासनाने ताब्यात घेवून मोफत पाणी वितरण करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यातील पानगांव येथे अल्पसंख्याक समाजाच्या पोलीस अधिकाऱ्यास झालेली मारहाण आणि इंदापुर येथे दलित समाजातील माय-लेकींना निवस्त्र करून झडती घेणे या दोन्ही घटना म्हणजे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे द्योतक असल्याची टीकाही मुंडे पत्रकारांशी बोलतांना यांनी केली .
राज्यातील प्रचंड दुष्काळ आणि विविध प्रश्नांवर चर्चा करावयाची असल्याने ९ मार्च पासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन १३ एप्रिल ऐवजी एप्रिलच्या शेवटपर्यंत वाढवण्याची मागणी आपण कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Hold the bottled water project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.