बनावट नोटांचा सूत्रधार ताब्यात
By admin | Published: July 13, 2015 01:03 AM2015-07-13T01:03:06+5:302015-07-13T01:03:06+5:30
बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रविवारी रात्री यश आले.
सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला रविवारी रात्री यश आले. सांगलीतील या सूत्रधाराची कसून चौकशी सुरू असून त्यातून आणखी दोघांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपुरात छापे टाकले आहेत.
दत्तवाड (ता. शिरोळ) येथे बनावट नोटा छपाईचा कारखाना दोन दिवसांपूर्वी उद्ध्वस्त करण्यात आला होता. नोटा मिरजेतील बाजारपेठेमध्ये खपविण्यासाठी आलेल्या ऐनुद्दीन ढालाईत या आरोपीस पोलीसांनी रंगेहात पकडले. यावेळी घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून सुमारे ३४ लाख ३५ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
आतापर्यंत टोळीतील सुभाष पाटील, रमेश घोरपडे, इम्रान ढालाईत यांना अटक झाली आहे. त्यांच्यामागे सांगलीतील सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्या सांगण्यावरून दत्तवाडमधील चौघांनी नोटांची छपाई केल्याचे पुढे आले आहे. या छापासत्रामुळे बनावट नोटांचे रॅकेट (प्रतिनिधी)