बारावीचा पेपर फुटल्याप्रकरणी विद्यार्थी ताब्यात
By admin | Published: March 5, 2016 04:03 AM2016-03-05T04:03:23+5:302016-03-05T04:03:23+5:30
परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून बारावीचा बुककिपींग अँड अकाउंटन्सीचा पेपर फुटल्याचे उघड झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मीरा रोड : परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून बारावीचा बुककिपींग अँड अकाउंटन्सीचा पेपर फुटल्याचे उघड झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यास ताब्यात घेतले आहे.
काशिमीराच्या रॉयल महाविद्यालयात १२ वीच्या परीक्षेचे केंद्र असून शुक्र वारी ११ ते २ या वेळेत बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा पेपर होता. परीक्षा केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना सईद मोहमद अझहर फैय्याज हा १२ वीचा विद्यार्थी मोबाईल घेऊन संशयास्पदरित्या आढळून आला. पर्यवेक्षक अझीमा शमीम खान यांनी त्वरित त्याचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासणी केली असता व्हॉटसअॅपद्वारे गुरु कुल क्लासेसच्या ग्रुपवर करीम या शिक्षकाने आणि शाहीद क्लास यांनी परीक्षा सुरू होण्याच्या अर्धातास आधीच प्रश्नपत्रिका पाठवली होती. त्यात उत्तरे सोडवलेली होती. या प्रकरणी अझीमा यांनी काशिमीरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पश्नपत्रिका फुटल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कदम यांनी सांंगितले. (प्रतिनिधी)