होळीआधीच वैशाख वणवा

By Admin | Published: March 13, 2016 05:10 AM2016-03-13T05:10:52+5:302016-03-13T05:10:52+5:30

दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे

Before the Holi celebrate Vaisakha | होळीआधीच वैशाख वणवा

होळीआधीच वैशाख वणवा

googlenewsNext

मुंबई : दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या महाराष्ट्रात होळीआधीच वैशाख वणवा पेटला आहे. सूर्याने आतापासूनच आग ओकायला सुरुवात केली असून, राज्याच्या अनेक भागांतील तापमानाने चाळिशी पार केली आहे. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या घोटभर पाण्यासाठी वणवण चालूच आहे. सर्वांत गंभीर स्थिती मराठवाड्यात आहे.
जायकवाडी धरणातील पाण्याने तळ गाठला असून, तिथे केवळ १ टक्का पाणी शिल्लक आहे. लातूर, जालनासह मराठवाड्यातील बहुतांश भागांत पंधरवड्यातून एकदा कसेबसे पाणी मिळते; तर सोलापूर शहरात पाच दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. कधी नव्हे ते ठाणे-मुंबईसह कोकणालाही पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. तापमानाचा पारा असाच चढता राहिला तर पाण्याचे संकट भीषण होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात मनमाड, नांदगाव व येवला येथे सात दिवसांनी पाणी येत आहे. दिंडोरी, सुरगाणा, पेठ, नांदगाव, देवळा, सटाणा येथेही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरींचे पाणी आटत आहे. पूरक नळ पाणीपुरवठा योजना ठप्प झाल्याने अनेक गावांमध्ये नळ केवळ देखाव्यापुरते उरले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोलापूर, लातूर, उस्मानाबादेत पाणीसंकट गहिरे, हिंगोलीत एक बळी
औज बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने सोलापुरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. पाणी एप्रिल अखेरपर्यंत पुरविण्यास आयुक्तविजयकुमार काळम यांनी पाणीपुरवठा आणखी एक दिवसाने पुढे ढकलला आहे.लातूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंधरा दिवसांपासून लातूरकरांना पाण्याचा एक थेंबही वाटप केलेला नाही़ लातूर शहरातील तब्बल ५ लाख नागरिक विकतच्या पाण्यावर तहान भागवत आहेत.ंहिंगोली जिल्ह्यातील पेंडगाव येथे पाणी टंचाईने ज्ञानेश्वर वाळके या तरूणाचा बळी घेतला. उस्मानाबाद जिल्ह्यात शेकडो गावांत टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा केला जात आहे़
>>प्रमुख शहरातील कमाल तापमानवर्धा ४०़५, चंद्रपूर ४०़२, अकोला ४०़१, सोलापूर ४०़१, पुणे ३६़१, जळगाव ३७़२, कोल्हापूर ३७, महाबळेश्वर ३२़४, मालेगाव ३९़२, नाशिक ३३़७, सांगली ३८, सातारा ३७़१, मुंबई ३४, अलिबाग २९़१, रत्नागिरी ३२़४, पणजी ३३़३, उस्मानाबाद ३७़२, औरंगाबाद ३६़६, परभणी ३९़५, अमरावती ३८़८, बुलढाणा ३७, गोंदिया ३६़६, नागपूर ३९़४, यवतमाळ ३९़

Web Title: Before the Holi celebrate Vaisakha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.