कर्मचाऱ्यांनी केली परिपत्रकाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:33+5:30
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या हिवताप व हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल फटींग, गडचिरोली जिल्हाध्यक्ष उद्धव डाबरे, उपाध्यक्ष तारकेश्वर अंबादे, सचिव अशोक नैताम, कोषाध्यक्ष अशोक पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक व आरोग्य पर्यवेक्षक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निष्काळजीपणा व गैरप्रकार होत असल्याचे कारण दाखवून हिवताप व हत्तीरोग विभागातील सर्व आरोग्य कर्मचारी व तंत्रज्ञांना जिल्हा परिषदेच्या यंत्रणेत हस्तांतरीत करण्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे. या संदर्भात २२ नोव्हेंबर २०१९ रोजी काढलेल्या अन्यायकारक शासकीय परिपत्रकाची येथील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी होळी केली.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याच्या हिवताप व हत्तीरोग विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांनी गडचिरोली येथील जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाराष्ट्र राज्य हिवताप, हत्तीरोग कर्मचारी संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष अनिल फटींग, गडचिरोली जिल्हाध्यक्ष उद्धव डाबरे, उपाध्यक्ष तारकेश्वर अंबादे, सचिव अशोक नैताम, कोषाध्यक्ष अशोक पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आरोग्य सहायक व आरोग्य पर्यवेक्षक उपस्थित होते. हिवताप निर्मूलन कार्यक्रम हा सन १९५५ पासून सुरू आहे. या विभागातील कर्मचारी मागील ५० वर्षांपासून कार्यरत असून ते नियमित सेवा देत आहे. मात्र शासनाने नवे परिपत्रक काढून कर्मचाºयांवर अन्याय केला आहे, असा आरोप संघटनेने केला आहे.
हिवताप व हत्तीरोग विभागातील अधिकाºयांनी निष्काळजीपणा व गैरप्रकार केल्याचे या परिपत्रकात नमूद आहे. यामध्ये कोणत्याही कर्मचाºयांच्या नावाचा उल्लेख नाही, असे असताना सुध्दा शासनाने जिल्ह्यातील हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाºयांचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे केले आहे. हे कर्मचारी कपातीचे धोरण आहे, असे संघटनेने म्हटले आहे.