सैलानी येथे पेटली नारळाची होळी

By admin | Published: March 13, 2017 03:46 AM2017-03-13T03:46:21+5:302017-03-13T03:46:21+5:30

सर्वधर्माचे श्रद्धास्थान असलेला हाजी अब्दूल रहेमान उर्फ सैलानी बाबाच्या यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी नारळाची होळी करण्यात आली.

Holi in the cottage with coconut | सैलानी येथे पेटली नारळाची होळी

सैलानी येथे पेटली नारळाची होळी

Next

विठ्ठल सोनुने,  पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा)
सर्वधर्माचे श्रद्धास्थान असलेला हाजी अब्दूल रहेमान उर्फ सैलानी बाबाच्या यात्रेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत १२ मार्च रोजी नारळाची होळी करण्यात आली.
नारळ होळीत अर्पण करण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी बहुसंख्य भाविकांनी त्यांच्या श्रद्धेनुरुप नारळाचे होळीत अर्पण केले. यावेळी भाविकांनी अंगातील जुने कपडेदेखील या होळीत टाकले. सैलानी बाबाचे परंपरागत मुजावर शेख रफिक मुजावर, हाजी शे.हाशम मुजावर, शे.नजीर शे.कासम मुजावर, शे.शफिक मुजावर, शे.रशिद मुजावर, पं.स.सदस्य शे.चाँद मुजावर उपस्थित होते. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
अग्निशामक दलाची कसोटी
प्रचंड प्रमाणात पेटलेली होळी आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला होळी विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. नजीम मुजावर यांनी सुरू केलेली होळीची सुरूवात सैलानी बाबाचे मुजावर शे.नजीर शे.कासम यांनी १९९० सालापासून सैलानी दर्गाजवळ होळी पेटविण्याची परंपरा सुरू केली होती. (वार्ताहर)

Web Title: Holi in the cottage with coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.