मतदानाच्या दिवशी सुट्टी! निवडणूक आयोगाची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2017 02:28 PM2017-02-09T14:28:50+5:302017-02-09T15:36:36+5:30

सुट्टी नसल्याने मतदान करता आले नाही, अशी सबब अनेकजण सांगतात. पण या महिन्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी

Holiday on holiday! Election Commission Announcement | मतदानाच्या दिवशी सुट्टी! निवडणूक आयोगाची घोषणा

मतदानाच्या दिवशी सुट्टी! निवडणूक आयोगाची घोषणा

Next
>ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 9 -  सुट्टी नसल्याने मतदान करता आले नाही, अशी सबब अनेकजण सांगतात. पण या महिन्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी तशी सबब तुम्हाला सांगता येणार नाही. कारण अधिकाधिक लोकांनी मतदान करता यावे आणि मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी राज्य  निवडणूक आयोगाने मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. 
राज्यात दहा महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांसाठी 16 आणि 21 फेब्रुवारी असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पैकी पहिल्या टप्प्यात 16 फेब्रुवारीला 15 जिल्हा परिषदा आणि 165 पंचायत समित्यांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यावेळी मतदानाच्या ठिकाणी सार्वजनिक सुट्टी असेल. 
तर दुसऱ्या टप्प्यात 21 फेब्रुवारीला 11 जिल्हा परिषदा 118 पंचायत समित्या आणि मुंबईसह, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड,  नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला,  सोलापूर या दहा महानगरपालिकांसाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या भागात 21 फेब्रुवारीला सार्वजनिक सुट्टी असेल. नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार असून, ज्या भागात मतदान असेल, त्या भागात सुट्टी लागू राहील.  

Web Title: Holiday on holiday! Election Commission Announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.