मज्जेसाठी पाऊसही घेणार सुटी!
By Admin | Published: August 14, 2016 01:25 AM2016-08-14T01:25:24+5:302016-08-14T01:25:24+5:30
स्वातंत्र्यदिनाला धरुन आलेल्या तीन दिवसांच्या सुटीची मजी लुटताना पाऊस खोडा घालणार नाही. श्रावणसरी अंगावर छेलत उन-पावसाचा खेळ पाहत-पाहत निसर्गाचा मनमुराद आनंद
पुणे : स्वातंत्र्यदिनाला धरुन आलेल्या तीन दिवसांच्या सुटीची मजी लुटताना पाऊस खोडा घालणार नाही. श्रावणसरी अंगावर छेलत उन-पावसाचा खेळ पाहत-पाहत निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटता येणार आहे.
झारखंड व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून ते आता दक्षिण बिहार व लगतच्या भागावर आहे. साहजिकच येत्या दोन दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची उघडीप राहणार आहे. अधूनमधून श्रावणसरी बरसतील, ऊन-पावसाचा खेळ राहिल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
गेल्या २४ तासात कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य-महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणातील रत्नागिरी ५०, माथेरान ४०, भिरा, हर्णे, संगमेश्वर- देवरुख ३०, दोडा मार्ग, जव्हार, कणकवली, कर्जत, खेड, लांजा, महाड, मंडणगड,माणगाव, सांगे, सुधागड पाली, वैभववाडी, वाल्पोई, वाडा २० मिमी पावसाची नोंद झाली़ (प्रतिनिधी)
२५० तालुक्यांत पावसाने ओलांडली सरासरी!
यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने आॅगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात सरासरीच्या १०७.५ टक्के पाऊस झाला आहे. मागील आठवड्यात ३५५ तालुक्यांपैकी आता २३१ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली होती. या आठवड्यात २५० तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.