होळकरांनो ! विझेपर्यंत होळीच्या जवळच थांबा !
By admin | Published: March 7, 2017 03:05 AM2017-03-07T03:05:17+5:302017-03-07T03:05:17+5:30
होळी पेटविताना विशेष काळजी घ्यावी, होळीच्या बाजूला पाण्याने भरलेली टाकी ठेवावी होळी पेटविण्यापूर्वी व होळी पेटविल्यानंतर लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.
पालघर : होळी पेटविताना विशेष काळजी घ्यावी, होळीच्या बाजूला पाण्याने भरलेली टाकी ठेवावी होळी पेटविण्यापूर्वी व होळी पेटविल्यानंतर लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. होळी पूर्ण थंड होईपर्यंत आयोजकांनी होळीचे ठिकाण सोडून जाऊ नये अशा खबरदारीच्या सूचना सहायक पोलीस निरिक्षक शिंदे यांनी केल्या.
धुलीवंदनाच्या दिवशी रस्त्यावर उभे राहुन कोणी ही येणाऱ्या - जाणाऱ्यां व्यक्तीकङून वर्गणी (पोसद) मागणार नाहीत अथवा बळजबरी करणार नाहीत. याबद्दल तक्रार प्राप्त झाल्यास त्या व्यक्तीच्या विरूध्द गुन्हा नोंदविला जाईल असेही त्यांनी सांगितले
धुलीवंदन साजरा करताना महिलांची छेडछाड होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच धूलीवंदनाच्या दिवशी चांगल्या प्रतीचेच रंग वापरावेत. कोणाला बाधा होईल आसे रंग वापरू नयेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. रंगांनी भरलेले फुगे अथवा पॅस्टिकच्या पिशव्या याचा मारा किंवा वापर करण्यावर कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. गच्चीवरून अथवा गॅलरी, बाल्यकन्या, खिडकितून रंग अथवा पाणी फेकल्याने अनेक ठिकाणी संघर्ष उद्भवतो म्हणून असे प्रकार टाळावेत असे आवाहनही पोलिसांनी जनतेला होळीच्या पार्श्वभूमीवर केले आहे. (वार्ताहर)
>वाहने नशेत चालवू नका, जीव धोक्यात घालू नका !
धुलीवंदनाचे दिवशी बहुदा व्यक्ती ह्या भांग (नशा येणारे आम्ल) पिऊन असतात व त्यानंतर मोटार सायकल वरून एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता आसते. तरी असे करू नये. असे आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असून धुलीवंदना नंतर आंघोळीसाठी समुद्र, तलाव, विहीरींमध्ये किवा खोल पाण्यामध्ये जातांना खबरदारी बाळगावी. असे ही त्यांनी सांगितले.
>१२ वी च्या महत्वाच्या परीक्षा सुरु असून उद्या १० वी च्या परीक्षा सुरू होणार आहेत. तरी विद्यार्थांना आभ्यास करताना वाजंत्री, लाऊडस्पीकर ह्यांचा व्यत्यय होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे, आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केले आहे.