उद्या नाही, १५ मेपासून घरपोच दारू मिळणार; फक्त एकच मोठी अट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 06:08 PM2020-05-13T18:08:27+5:302020-05-13T18:10:13+5:30

केंद्र सरकारने देशभरातील दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच एका दुकानासमोर पाच ग्राहक, सोशल डिस्टन्सिंग अशी नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र, याला देशभरात हरताळ फासत तळीरामांनी तोबा गर्दी केली होती.

home delivery of liquor will be available from May 15; need licence hrb | उद्या नाही, १५ मेपासून घरपोच दारू मिळणार; फक्त एकच मोठी अट

उद्या नाही, १५ मेपासून घरपोच दारू मिळणार; फक्त एकच मोठी अट

Next

मुंबई : येत्या १४ मे पासून घरपोच दारु देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, यामध्ये एक छोटासा बदल करण्यात आला आहे. आता घरपोच दारूची डिलिव्हरी १४ ऐवजी १५ मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तसेच यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. 


केंद्र सरकारने देशभरातील दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच एका दुकानासमोर पाच ग्राहक, सोशल डिस्टन्सिंग अशी नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र, याला देशभरात हरताळ फासत तळीरामांनी तोबा गर्दी केली होती. यामुळे पोलिसांना अनेक ठिकाणी लाठीमारही करावा लागला होता. कोल्हापुरात तर वाईन शॉपसमोर दोन गटांमध्ये राडा झाला होता. यामुळे राज्यभरात अनेक जिल्ह्यांमध्ये दारु विक्री बंद करण्यात आली होती. 


काही जिल्ह्यांमध्ये दारु विक्री आणि काही जिल्ह्यांमध्ये दारु बंदी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे राज्याचा महसूल बुडत होता. यावर राज्य सरकारला तातडीने पैसे मिळवून देणाऱ्या व्यवसायांना प्राधान्याने सुरू करावे. त्यासाठी दारूची दुकाने सुरू करावीत, बांधकाम, पायाभूत सुविधा, या व्यवसायांना गती द्यावी, आणि सरकारने सुरू केलेल्या पायाभूत प्रकल्पांची कामे तातडीने सुरू करावीत, अशा शिफारशी राज्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी काय करावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ञांच्या अभ्यासगटाने केल्या आहेत. हा अहवाल शुक्रवारी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांना देण्यात आला होता.


यावर मंगळवारी घरपोच मद्याची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी अधिकाऱ्यांनी वेळ मागितल्याने ही मुदत एका दिवसाने वाढविण्यात आली आहे. डिलिव्हरी बॉयचे आरोग्य प्रमाणपत्र, सॅनिटायझर, मास्क, ग्लोव्हज आदी वस्तूंचा पुरवठा करणे आणि पुरेसी तयारी करण्यासाठी ही वेळ मिळाली आहे. यामुळे १५ मे पासून ही होम डिलिव्हरी सुरु होणार आहे. यासाठी एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. 


घरपोच दारू केवळ मद्य पिण्याचा परवाना असलेल्या व्यक्तींनाच देण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे हा परवाना नसेल तर तो दारु मागवू शकणार नाही. यासाठी वेगळी सोय उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. एखाद्या व्यक्तीला दारु मागवायची असेल तर त्याला एफएल-एफ परवाना काढावा लागणार आहे. हा परवाना वाईन शॉप, बिअर शॉपवाल्यांकडूनच दिला जाणार आहे. 


दारु कशी मागवाल?
घरपोच दारु मिळणार हे समजल्यापासून तळीरामांमध्ये एकच प्रश्न उपस्थित होत आहे, की दारू कशी मागवायची? यासाठी व्हॉट्सअॅप, मेसेज, फोनचा वापर करता येणार आहे. दुकानदार त्यांच्या दुकानाबाहेर ठळक अक्षरात त्यांचा संपर्क क्रमांक लिहिणार आहेत. याद्वारे त्यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जो वेळ दिला असेल त्याच वेळेत मद्य विकता येणार आहे. ग्राहकाला एमआरपीनेच मद्याची विक्री करावी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे कंटेनमेंट झोनमध्ये दारु घरपोच मिळणार नाही. 

महत्वाच्या बातम्या...

सर्वसामान्य नोकरदारांना मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांच्याकडून मुदतवाढ

Atmanirbhar Bharat Abhiyan मध्यम, कुटीर, लघु उद्योगासाठी तीन लाख कोटींचे विनातारण कर्ज; निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा

 

Web Title: home delivery of liquor will be available from May 15; need licence hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.