‘होम डिलेवरी’ वेश्या व्यवसायातील नवीन ट्रेंड
By admin | Published: July 4, 2016 09:20 AM2016-07-04T09:20:47+5:302016-07-04T09:24:47+5:30
वेश्या व्यवसायाचे अड्डे चालविण्याचा काळ मागे पडला असून आता वेश्या व्यवसायासाठी युवती गि-हाईकांना घरपोच पोहोविण्याची नवी पद्धत सर्रासपणे सुरू झाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी : वेश्या व्यवसायाचे अड्डे चालविण्याचा काळ मागे पडला असून आता वेश्या व्यवसायासाठी युवती गि-हाईकांना घरपोच पोहोविण्याची नवी पद्धत सर्रासपणे सुरू झाल्याचे पोलीसांच्या अलीकडच्या कारवायांतून स्पष्ट झाले आहे. गि-हाईकांना घरपोच म्हणजेच त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी युवतींना पोहोचविण्याचे काम दलाल करीत आहेत.
वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यांवर छापे टाकण्याचे प्रमाण वाढल्यामुळे असे अड्डे चालविणे जोखमीचे आहेत याची जाणीव वेश्या दलालांना झाली आहे. त्यामुळे वेश्या व्यवसाय सोडला नाही तर वेश्या व्यवसायाची पद्धत बदलण्यात आली आहे. गि-हायिकांशी आॅन लाईन संपर्क यापूर्वीही चालू होता, परंतु हा संपर्क झाल्यानंतर गि-हायिकांना अड्ड्याचा पत्ता सांगण्याऐवजी गि-हायिकांचा पत्ता दलालांकडून घेतले जातात. त्यानंतर त्यांना सोयीच्या ठिकाणी युवतींना पोहोचविले जाते. त्यासाठी ट्युरीस्ट टॅक्सींचा वापर केला जात आहे.
बोगस ट्युरीस्ट गाईड्स या कामात महत्त्वाची भुमिका बजावत असतात. गिºहायिक आपली सोयीची जागा ठरविताना भाड्याचा फ्लॅट किंवा एखाद्या लॉजिंगमधील खोलीचा पत्ता सांगतो. अधिक गिºहायिक हे गोव्यात पर्यटक म्हणून येणारे लोक असतात. त्यामुळे अशा लोकांसाठी भाड्याच्या खोलींची व्यवस्थाही दलालाकडूनच केली गेल्याचे प्रकारही आढळून आले आहेत.
पोलिसांनी सलग केलेल्या कारवाईमुळे वेश्या व्यवसायाला थोडा वचक बसला आहे.
दलालांनी पद्धती बदलल्या असल्या तरीही पोलिसांचे त्यावर लक्ष्य आहे असे गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. कुठेही असे संशयित प्रकार सुरू असल्यास पोलिसांना त्याची माहिती द्यावी, त्वरित कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
पोलीस प्रशासनाकडून घेतलेल्या निर्णयानुसार वेश्या व्यवसायाविरुद्धच्या काराया ह्या सातत्याने करण्याची सूचना सर्व पोलीस स्थानके आणि गुन्हा अन्वेषण विभागाला गेल्या आहेत. गुन्हा अन्वेषण विभागाने तर या बाबतीत कारवायांचा धडाका लावताना कळंगूट, पर्वरी, मिरामार, हणजुणे या भागात धडाधड छापे टाकले. या छाप्यातून अनेक दलालांना पकडण्यात आले आणि युवतींची सुटका करण्यात आली.
एखाद्या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर गुन्हा अन्वेषण विभागाकडून छापा टाकण्यात आला तर संबंधित पोलीस स्थानकाने या प्रकरणात का कारवाई करण्यात आली नाही याचे स्पष्टीकरण त्या पोलीस स्थानकाच्या प्रमुखाला आपल्या वरिष्ठांना द्यावा लागतो. त्यामुळे पोलीस स्थानकेही सतर्क झाली आहेत. त्यामुळे वेश्याव्यवसायाचे अड्डे चालविण्यापेक्षा घरपोच युवती पाठविणे हे त्यांना सोयीस्कर वाटत आहे.