होमगार्डच्या नेमणुकांवर टाच!

By Admin | Published: December 5, 2014 03:38 AM2014-12-05T03:38:16+5:302014-12-05T03:38:16+5:30

पोलिसांच्या मदतीसाठी गडचिरोली जिल्ह्णात व मुंबई शहरात होमगार्डच्या बारमाही नेमणुका केल्या जात होत्या. मात्र, नवीन सरकारने यावर १ डिसेंबरपासून प्रतिबंध घातला असून

Home Guard appointed! | होमगार्डच्या नेमणुकांवर टाच!

होमगार्डच्या नेमणुकांवर टाच!

googlenewsNext

दिगंबर जवादे, गडचिरोली
पोलिसांच्या मदतीसाठी गडचिरोली जिल्ह्णात व मुंबई शहरात होमगार्डच्या बारमाही नेमणुका केल्या जात होत्या. मात्र, नवीन सरकारने यावर १ डिसेंबरपासून प्रतिबंध घातला असून, आता इतर जिल्ह्णांप्रमाणेच महत्त्वाचे सण व परीक्षेच्या कालावधीतच या नेमणुका केल्या जाणार आहेत़ परिणामी होमगार्डस्वर बेराजगाराची कुऱ्हाड कोसळणार असून, पोलीस प्रशासनावरही कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे़
नक्षल चळवळीमुळे गडचिरोली अतिसंवदेनशिल जिल्हा म्हणून ओळखला जाते. पोलिसांना नक्षल अभियान राबविण्याबरोबरच गाव व शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीसुध्दा काम करावे लागते. पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व गुन्ह्णांचा शोध घेणे ही दैनंदिन कामेही करावीच लागतात. पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्याबरोबरच त्यांना मदत म्हणून जिल्ह्णात होमगार्डच्या बारमाही नेमणूका केल्या जात होत्या.
२००५ पासून मुंबई शहर व गडचिरोली जिल्हा वगळता इतर जिल्ह्णांमध्ये होमगार्डच्या नेमणूका गणपती, नवरात्रोत्सव व परीक्षेच्या कालावधीतच केल्या जात होत्या. जिल्ह्णात एकूण ८०० होमगार्ड कार्यरत आहेत. होमगार्डला दररोज ४०० रूपये मानधन दिले जाते.
बारमाही नेमणूका होत असल्याने त्यांच्या कुटुंबाला थोडीफार आर्थिक मदत होत होती. पोलीस दलालाही वेळोवेळी सहाय्य होत होते. मात्र एक महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या नवीन सरकारने प्रशासकीय खर्चात कपात करण्याच्या उद्देशाने मुंबई शहर व गडचिरोली जिल्ह्णातील होमगार्डच्या बारमाही नेमणुकांवर टाच आणली आहे. इतर जिल्ह्णांप्रमाणेच होमगार्डची नेमणूक महत्त्वाचे सण, निवडणूक व परीक्षा कालावधीपुरतीच करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार १ डिसेंबर पासून नेमणूका बंद झाल्या आहेत. या नवीन आदेशामुळे होमगार्ड कुटुंबीय आर्थिक संकटात सापडले असून, पोलीस दलालाही अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: Home Guard appointed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.