होमगार्डच्या पूनर्नियुक्तीचा वाद शिगेला, शासन निर्णयामुळे वाद पेटला,
By admin | Published: July 1, 2016 10:29 AM2016-07-01T10:29:34+5:302016-07-01T13:47:37+5:30
पूनर्नियुक्ती न करता थेट कामावरुन काढल्याने होमगार्डचे तीनशे कर्मचारी मुंबईत रस्त्यावर उतरले आहेत.
Next
>घाटकोपरमध्ये होमगार्ड कर्माचा-यांचा हंगामा
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - पूनर्नियुक्ती न करता थेट कामावरुन काढल्याने होमगार्डचे तीनशे कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. 2010 पासून लागू केलेल्या शासन निर्णयानुसार होमगार्ड कर्मचारी 12 वर्षे सेवा करण्याची तरतूद असल्याने त्यांना कामावर काढण्यात आले. घटकोपरच्या नारायण नगर परिसरातील प्रशिक्षण केंद्राबाहेर हा गोंधळ सुरु आहे. किरकोळ धक्काबुक्कीही यावेळी करण्यात आली. होमगार्डचे महासंचालक राकेश मारीया थोड्याच वेळात घटनास्थळी पोहोचतील.
होमगार्ड पूनर्नियुक्तीचा वाद शासन निर्णयामुळे शिगेला पोचला असून होमगार्डनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
(छायाचित्रे - सुशील कदम)