ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी होणार होमगार्ड नोंदणी
By admin | Published: June 28, 2016 02:46 AM2016-06-28T02:46:43+5:302016-06-28T02:46:43+5:30
यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी २,१२० होमगार्ड सदस्यांची नोंदणी पथक आणि उपपथकांसाठी होणार आहे.
ठाणे : यंदा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी २,१२० होमगार्ड सदस्यांची नोंदणी पथक आणि उपपथकांसाठी होणार आहे. ही नोंदणी ५ जुलै रोजी सकाळी ७ ते १२ दरम्यान ठाण्यातील पोलीस कवायत मैदानात होणार आहे. इच्छुकांनी होमगार्ड सदस्य नोंदणी करावी, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक तथा जिल्हा समादेशक, होमगार्ड ठाणे (पालघर) प्रशांत कदम यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यासाठी १४१४, तर पालघरसाठी ६७९ पुरुष आणि महिला सदस्यांची नोंदणी होणार असून नोंदणी पात्रतेसाठी कमीतकमी दहावी उत्तीर्ण अपेक्षित आहे. तर, वयोमर्यादा २० ते ५० अशी ठेवली आहे.
पुरु षांकरिता १६२ सेंटीमीटर व महिलांसाठी १५० सेंटीमीटर उंची हवी. उमेदवाराची शारीरिक चाचणीही घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
>नाहरकत प्रमाणपत्र, पोलीस चारित्र्यपडताळणी अहवाल व सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक अथवा एनसीसी प्रमाणपत्रधारक आणणे बंधनकारक आहे. विशेष उमेदवारास नोंदणीच्या वेळी येण्याजाण्याचे कोणतेही पैसे मिळणार नसून नोंदणीच्या वेळी कोणतीही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार असल्याचे कदम यांनी सांगितले.
>जिल्हा समादेशक, होमगार्ड ठाणे अनुशेष दर्शविणारा तक्ता
पथकपुरु षमहिलाएकूण
ठाणे२१८११२३३०
डोंबिवली५०२८७८
कल्याण२२३११६३३९
उल्हासनगर ४८११७१६५
अंबरनाथ३४१२६१६०
भिवंडी१६९३३२०२
शहापूर३२६३९५
मुरबाड३७३५७२
पालघर६९१८८७
वाडा५६२४८०
जव्हार१५४१६१७०
मोखाडा६५२७९२
वसई१०८३८१४६
तलासरी१०२८३८
एकूण१३२९७९१२१२०