आता तर कळस झाला; मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 07:52 PM2021-03-20T19:52:18+5:302021-03-20T19:55:44+5:30

home minister anil deshmukh must resign says devendra fadnavis: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप

home minister anil deshmukh must resign says devendra fadnavis | आता तर कळस झाला; मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा- फडणवीस

आता तर कळस झाला; मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा- फडणवीस

Next

मुंबई: मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक  त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते. दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. 

अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा १०० कोटी गोळा करायला सांगितले होते; परमबीर सिंग यांचा खळबळजनक आरोप

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांचे आरोप फक्त खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे, असं फडणवीस म्हणाले.

स्वत:ला वाचवण्यासाठी परमबीर सिंग खोटा आरोप करताहेत; गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळला

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा. या संपूर्ण आरोपींची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हायला हवी. राज्य सरकारला केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणारी चौकशी मान्य नसल्यास न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

परमबीर सिंग डीजी म्हणून कार्यरत आहेत. डीजी म्हणून काम करत असलेल्या अधिकाऱ्यानं केलेले आरोप गांभीर्यानं घ्यायला हवेत. याशिवाय परमबीर सिंग यांनी त्यांच्या आरोपात संभाषणदेखील जोडलं आहे. त्यामुळे या सगळ्या आरोपांचं गांभीर्य वाढतं. मुख्यमंत्री ठाकरेंनी अनेकदा दोषी असल्यासकारवाई करण्याची भाषा केली आहे. त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवावेत, असं फडणवीस यांनी पुढे म्हटलं आहे.

Web Title: home minister anil deshmukh must resign says devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.