आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 11:24 AM2021-02-18T11:24:02+5:302021-02-18T11:25:51+5:30

Anil Deshmukh : संजय नारनवरे यांच्या अपघाती निधनानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली असं म्हणत गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली.

Home Minister expresses grief over accidental death of security guard police twitter sanjay narnavare | आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

Next
ठळक मुद्देदेशमुखांच्या पोलीस सुरक्षा गार्डचं बुधवारी अपघातात झालं निधनअनिल देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरच्या निवासस्थानी पोलीस अंमलदार संजय नारनवरे हे सुरक्षा गार्ड म्हणून तैनात होते. परंतु त्याचं अपघातात निधन झालं. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून ट्वीट करत त्यांना श्रद्घांजली वाहिली आहे. 

"माझ्या नागपूरच्या निवासस्थानी बंगला सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत असणारे पोलीस अंमलदार संजय नारनवरे यांचे अपघातात दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहेत. संजय यांच्या जाण्याने आम्ही आमच्या घरातील एक सदस्य आज गमावला आहे," असं म्हणत अनिल देशमुख यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी यासोबत संजय नारनवरे यांचा फोटोही शेअर केला आहे. 



पोलीस अंमलदार संजय नारनवरे हे अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सुरक्षा गार्ड म्हणून कार्यरत होते. बुधवारी रात्री त्यांचं अपघाती निधन झालं. नांदगाव फाटा येथे त्यांच्या बाईकला एका ट्रकनं जोरदार धडक दिली. यात नारनवरे यांचा मृत्यू झाला. या घटनेंतर अनिल देशमुख यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. 

Web Title: Home Minister expresses grief over accidental death of security guard police twitter sanjay narnavare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.