गृहराज्यमंत्र्यांनी केले बीयर बारचे उद्घाटन!

By admin | Published: May 12, 2015 01:14 AM2015-05-12T01:14:49+5:302015-05-12T01:14:49+5:30

दारुबंदीसाठी चळवळ करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याच जिल्ह्यात गृहराज्यमंत्री राम शिंदे व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी

Home Minister inaugurates the Beer Bar! | गृहराज्यमंत्र्यांनी केले बीयर बारचे उद्घाटन!

गृहराज्यमंत्र्यांनी केले बीयर बारचे उद्घाटन!

Next

अहमदनगर : दारुबंदीसाठी चळवळ करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याच जिल्ह्यात गृहराज्यमंत्री राम शिंदे व अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी एका परमीट रुममधील फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन केल्याने सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत असून, मंत्र्यांच्या या कृतीवर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे़
जिल्ह्यात गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून दारुबंदी चळवळ जोर धरत असताना पालकमंत्री शिंदे व अर्थराज्यमंत्री केसरकर यांंनी सुपा परिसरात एका बारमधील फॅमिली रेस्टॉरंटचे उद्घाटन केल्याने टीका सुरू झाली आहे.
दारुबंदी मोहिमेतील कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे़ व्यसनमुक्तीच्या प्रचार आणि प्रसारात लोकप्रतिनिधींनी हातभार लावण्याची अपेक्षा असताना मद्याचे उदात्तीकरण केले जात असल्याबद्दल चळवळीतील कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.
जिल्ह्णात सध्या दारुबंदीसाठी जनजागृती सुरु आहे. विविध सामाजिक संघटना यात सक्रीय आहेत. लोकप्रतिनिधींकडून कोणताही पाठींबा नसताना या मोहिमेंतर्गत आतापर्यंत ६०० ग्रामपंचायतींनी दारुबंदीचा ठराव संमत करत दारुविरुद्धची चीड स्पष्ट केली आहे. दारुबंदी मोहीम एकीकडे सर्वत्र पोहोचत असताना गृह, आरोग्य, पर्यटन राज्यमंत्रीपद आणि जिल्ह्णाचे पालकमंत्री अशी जबाबदारी सांभाळणाऱ्या लोकप्रतिनिधीनेच बारमालकाबरोबर ऊठ-बस करणे हे सरकारचे नैतिक पातळीवरील अध:पतन असल्याची टिका चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे.
शनिवारी उशिरा सायंकाळी पुणे रस्त्यावरील सुपा टोल नाक्याजवळ असलेल्या या हॉटेलचे उद्घाटन झाले. यावेळी मंत्र्यांसोबत काही लोकप्रतिनिधी व अधिकारीही उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्णात दारुबंदीसाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी मंत्रीपद पणाला लावले होते़ तर नगरचे पालकमंत्री व समाजाच्या नेतृत्वाचा ठेका घेतलेली नेतेमंडळी स्वयंस्फुर्तीने सुरू असलेल्या दारुबंदी मोहिमेलाही खो बसेल, असे कृत्य करत असल्याची टीका चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Home Minister inaugurates the Beer Bar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.