घरातलं राजकारण रंगणार!
By admin | Published: September 30, 2014 02:35 AM2014-09-30T02:35:05+5:302014-09-30T02:35:05+5:30
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची चांगलीच राजकीय पंचाईत झाली आहे. मोठा मुलगा आशिष नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये भाजपाचा उमेदवार आहे,
Next
>यदु जोशी - मुंबई
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांची चांगलीच राजकीय पंचाईत झाली आहे. मोठा मुलगा आशिष नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये भाजपाचा उमेदवार आहे, तर लहान डॉक्टर मुलगा अमोल रामटकेमधून राष्ट्रवादीकडून लढतोय!
आशिष यांनी गेल्यावेळी सावनेरमधून भाजपातर्फे निवडणूक लढविली आणि ते काँग्रेसचे सुनील केदार यांच्याकडून कमी फरकाने हरले होते. यावेळी त्यांनी पुन्हा पक्षाकडे सावनेरसाठी उमेदवारी मागितली पण पक्षाने त्यांना काटोलमध्ये पाठविले.
विशेष म्हणजे काटोलमध्ये त्यांचा सामना काका माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याशी आहे. अनिल देशमुख 1995 पासून काटोलचे आमदार आहेत आणि दहा महिन्यांचा अपवाद वगळता मंत्रीही राहिले.
रामटेकची जागा आघाडीमध्ये काँग्रेसच्या कोटय़ात होती. डॉ.अमोल हे काँग्रेसच्या तिकिटाचे दावेदार होते पण तेथे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी मिळाली. म्हणून अमोल यांना माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि अनिल देशमुख यांनी एकत्र बसून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. आता अनिल देशमुख यांना अमोल यांच्या प्रचारासाठी रामटेकला जावे लागणार आहे. रणजित देशमुख यांचे बोट धरून अनिल देशमुख राजकारणात आले. वडविहिरा, काटोल आणि नागपूरमध्ये दोघांची घरे ही भिंतीला भिंत लागून आहेत. रणजित देशमुख यांची राजकीय कारकिर्द काटोलमधूनच बहरली. पुढे ते सावनेरला गेले. इकडे अनिल देशमुखांनी काटोल काबीज केले. सूत्रंनी सांगितले की रणजित देशमुख यांनी यावेळी काटोलमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण आधी तुमच्या मुलाला भाजपामधून काँग्रेसमध्ये आणा, अशी अट काँग्रेसने घातली होती. मुलगा माङो ऐकणार नाही, असे त्यांनी पक्षाला सांगितल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला.
मी काँग्रेसमध्ये असलो तरी काँग्रेसचा प्रचार करणार नाही. पक्षाने माझी उपेक्षाच केली आहे. माङयासमोर धर्मसंकट आहे त्यामुळे मी दोन्ही मुलांचा प्रचार करेल. दोघांच्याही राजकीय भवितव्याची मला चिंता आहे.
-रणजित देशमुख, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष
भाजपाने माङयाविरुद्ध कुटुंबातील सदस्याला उभे करून घरात राजकारण आणले.मी आशिष किंवा रणजितबाबूंवर वैयक्तिक टीका करणार नाही.
- अनिल देशमुख, माजी मंत्री.
रणजित देशमुख यांनी यावेळी काटोलमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. पण आधी तुमच्या मुलाला भाजपामधून काँग्रेसमध्ये आणा, अशी अट काँग्रेसने घातली होती.