राळेगणसिद्धीत वंचितांच्या घरी दिवाळी
By admin | Published: October 26, 2014 01:04 AM2014-10-26T01:04:47+5:302014-10-26T01:04:47+5:30
निवृत्तीवेतनातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्याने राळेगणसिद्धी व परिवारातील ‘त्या’ वंचितांच्या घरी दिवाळीच साजरी झाली.
Next
पारनेर(जि. अहमदनगर) : कष्टक:यांच्या सर्व कुटुंबातील व्यक्तींना साडी, चोळी, धोतर, कुर्ता व मुलांना कपडे यासह विविध वस्तू व फराळ आपल्या निवृत्तीवेतनातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्याने राळेगणसिद्धी व परिवारातील ‘त्या’ वंचितांच्या घरी दिवाळीच साजरी झाली. अण्णांनी शनिवारी दिलेल्या शाली व वस्तूंनी त्यांना मायेची ऊबच मिळाली.
अण्णांची सामाजिक कामे, विविध व्याख्याने व कार्यक्रमांसाठी देशभर व परदेशातही दौरे झाले. या दौ:यांमध्ये ते
सत्कार करण्यास नकार देतात. परंतु अनेक
जण आग्रह व आपुलकीने शाल व इतर
भेटवस्तू देतात. या शाली व भेटवस्तू
अण्णा एकत्र करतात. शिवाय अण्णांना लष्करातून निवृत्त झाल्यावर मिळणारे निवृत्ती वेतन व विविध बक्षीस व पुरस्कारांची रक्कम बँकेत ठेवून त्यातून मिळणा:या व्याजातून प्रत्येक दिवाळीला राळेगणसिद्धीसह पंचक्रोशीतील सामान्य कुटुंबाला कपडे, शाली व भेटवस्तु देण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे.
शनिवारी राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी, अण्णांचे सहाय्यक दत्ता आवारी यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत सुमारे दोनशे विविध वस्तुंचे वाटप, गरजू कुटुंबांना घरातील साहित्य, कपडे व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)
समाजासाठी कार्य
मी देशहित व समाजहिताचा विचार करूनच जीवन जगण्याचे काम करतो. मला संपत्तीचा मोह नाही. त्यामुळे मला येणा:या निवृत्तीवेतनातून समाजातील गरजू लोकांना हातभार लागण्याचे कार्य समाजासाठीच आहे.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक