घरांच्या रंगरंगोटीवर महागाईचे विघ्न !
By admin | Published: October 16, 2016 06:33 PM2016-10-16T18:33:57+5:302016-10-16T18:33:57+5:30
दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठा आनंद व उत्साहाचा सण़ घराची रंगरंगोटी, विविध वस्तू व कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली की
Next
>ऑनलाइन लोकमत / संतोष वानखडे
वाशिम, दि. 16 - दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वांत मोठा आनंद व उत्साहाचा सण़ घराची रंगरंगोटी, विविध वस्तू व कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरू झाली की, दिवाळीची चाहुल लागते. दिवाळीच्या कामांची सुरुवात होते ती घराच्या रंगरंगोटीपासूऩ यंदा मात्र रंगांच्या किंमती, पेंटरच्या मजुरीत प्रचंड वाढ झाल्याने रंगरंगोटीवर महागाईचे विघ्न असल्याचे दिसून येते.
दिवाळीच्या उत्सवात नाविण्यावर अधिक भर असतो़ म्हणूनच नवीन रंग देण्यापासून तर नवनवीन वस्तू खरेदी करण्यापर्यंत अनेक गोष्टींना दिवाळीत प्राधान्य दिले जाते़ घराची साफसफाई हे काम सर्वात आधी केल्यानंतर घराच्या भिंती रंगविण्याला सुरूवात होते़ पूर्वी चुन्यात पाहिजे तो रंग मिसळून घराच्या भिंती रंगविल्या जायच्या़ १००-२०० रुपयात संपूर्ण घर रंगविले जात असे़ परंतु आता रंगांचे शेकडो प्रकार बाजारात उपलब्ध आहेत़ यावर्षी रंगांच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येते. साधारणत: दोन वर्षांपूर्वी ४० ते १३० रुपये किलो दराने विकले जाणारे ‘डिस्टेंपर’ आता ६० ते २०० रुपयांपर्यंत गेले आहे. विविध रंगातील माती आता ५० ते ८० रुपये किलो दराने उपलब्ध आहे़ ४०० ते एक हजार रुपयांच्या दरम्यान असलेले ‘रॉयल प्लॅस्टिक’ रंगांचे दर आता ६०० ते १३०० असे झाले आहेत. पूर्वी १५० ते ३५० रुपयांच्या दरम्यान असलेले ‘एसपेंट’ आता २०० ते ४५० रुपयांच्या दरम्यान आहे. पूर्वी २५० ते २३० रुपयांदरम्यान असलेले ‘आॅईलपेंट’ आता प्रति लिटर ३५० ते ४५० रुपयांवर गेले आहे. ‘प्लास्टीक पेंट’ ३५० ते ५०० रुपये प्रति लिटर, ‘लक्झरीयस पेंट’ ७५० ते ९०० रुपये असे दर आहेत.
रंगाव्यतिरिक्त एका घराला ब्रश, स्टेनर, थिनर व टारपेन या साहित्यासाठी साधारणत: ७०० ते १५०० रुपयापर्यंतचा खर्च अपेक्षीत आहे. पेंटरच्या मजुरीचा खर्चही घरमालकाला पेलावा लागतो. विविध प्रकारची पेंटींग ३०० ते ८०० रुपये प्रती ब्रास आहे.