कोकणातील घरांची सूचनापत्रे सोमवारपासून
By admin | Published: April 7, 2016 02:39 AM2016-04-07T02:39:49+5:302016-04-07T02:39:49+5:30
म्हाडाच्या वतीने काढण्यात आलेल्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीनंतरची प्रक्रिया करण्यासाठी ‘मुहूर्त’ मिळाला आहे. येत्या सोमवारपासून (११ एप्रिल) विजेत्यांना त्याबाबतची सूचनापत्रे पाठवून
मुंबई : म्हाडाच्या वतीने काढण्यात आलेल्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीनंतरची प्रक्रिया करण्यासाठी ‘मुहूर्त’ मिळाला आहे. येत्या सोमवारपासून (११ एप्रिल) विजेत्यांना त्याबाबतची सूचनापत्रे पाठवून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. संबंधितांना २० मेपर्यंत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार असून १ जुलैपर्यंत देकारपत्रे पाठविली जातील, असे कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने यांनी सांगितले. १८ एप्रिल ते २० मेपर्यंत विजेत्यांनी कागदपत्रे बॅँकेत सादर करावयाची आहेत. १६ मे ते ३० जूनपर्यंत या कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चित केली जाईल. त्यानंतर पात्र अर्जदारांना १ जुलैपासून पैसे भरण्यासाठी देकारपत्र पाठविले जाईल. त्याची पूर्तता झाल्यानंतर नोंदणी करून संबंधितांना घराचा ताबा दिला जाईल, असे विजय लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)