विद्यार्थ्यांना दिला जाणार मतदानाचा ‘होमवर्क’!

By Admin | Published: September 30, 2014 12:43 AM2014-09-30T00:43:20+5:302014-09-30T01:01:50+5:30

मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा अकोला जिल्हा प्रशासनाचा फंडा.

'Homework' to be given to students. | विद्यार्थ्यांना दिला जाणार मतदानाचा ‘होमवर्क’!

विद्यार्थ्यांना दिला जाणार मतदानाचा ‘होमवर्क’!

googlenewsNext

संतोष येलकर/अकोला
मतदानाच्या एक दिवस आधी, जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना कुटुंबातील सदस्यांच्या मतदानाबाबत गृहपाठ (होमवर्क) दिला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या कामात विद्यार्थी हे उत्तम संदेशवाहक ठरत असल्याने विद्यार्थ्यांना सहभागी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत, मतदानाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी गृहपाठ दिला जाणार आहे. इयत्ता दुसरी ते इयत्ता बारावीमधील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांकडून हा गृहपाठ दिला जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींची संख्या किती, मतदार यादीत किती जणांची नावे आहेत, घरात एकूण मतदार किती, त्यापैकी किती जणांनी मतदान केले, मतदान केंद्राचे नाव काय, म तदान करणार्‍यांची नावे अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे वहीत लिहून आणणे, अशा स्वरूपाचा हा गृहपाठ आहे. मतदानाच्या दुसर्‍या दिवशी, १६ ऑक्टोबर रोजी विद्या र्थ्यांचा गृहपाठ संबंधित शाळांमधील शिक्षकांकडून तपासण्यात येईल. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलाविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी अरूण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची ही मोहिम आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना मतदानासंबंधी ह्यहोमवर्कह्ण मध्ये सहभागी करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगीतले.

Web Title: 'Homework' to be given to students.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.