होमी भाभा यांच्या मलबार येथील बंगल्याचे म्युङिायम व्हावे!

By admin | Published: June 24, 2014 12:21 AM2014-06-24T00:21:40+5:302014-06-24T12:43:41+5:30

डॉ़ होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील मेहरंगीर बंगल्याचे म्युङिायम करण्याचा मानस असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केल़े

Homi Bhabha to be built at Malabar's bungalow! | होमी भाभा यांच्या मलबार येथील बंगल्याचे म्युङिायम व्हावे!

होमी भाभा यांच्या मलबार येथील बंगल्याचे म्युङिायम व्हावे!

Next
>मुंबई :  तरुणांना प्रेरणा मिळण्यासाठी भारतीय अणुसंशोधनाचे जनक डॉ़ होमी जहांगीर भाभा यांच्या मलबार हिल येथील मेहरंगीर बंगल्याचे  म्युङिायम करण्याचा मानस असल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्र सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सादर केल़े या बंगल्याचा लिलाव झाल्यानंतर केंद्र सरकारने हे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने आता न्यायालय यावर काय निर्देश देणार याकडे सर्वाचेच लक्ष लागले आह़े 
हा बंगला हेरिटेज घोषित करावा, असे महाराष्ट्र सरकारला सांगण्यात आले आह़े त्यामुळे हा बंगला तोडण्यास न्यायालयाने मनाई करावी, अशी मागणी प्रतिज्ञापत्रत करण्यात आली आह़े मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या खंडपीठासमोर हे प्रतिज्ञापत्रत करण्यात आल़े त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी 3क् जूनर्पयत तहकूब केली़ 
अणुऊर्जा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मोतीराम वरळीकर व इतरांनी अॅड़ विक्रम वालावलकर यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आह़े डॉ़ भाभा  यांनी बॉम्बे कॉर्पोरेशन लि़कडून 1937मध्ये हा बंगला घेतला़ आई मेहरबाई व वडील जहांगीर ही दोन नावे एकत्रित करून त्यांनी या बंगल्याचे नाव मेहरंगीर असे ठेवल़े या बंगल्यात ते आई-वडील व भाऊ जमशेदसोबत राहत होत़े  17 हजार 15क् चौ़ फुटांवर असलेला हा बंगला स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या अनेक गोष्टींचा साक्षीदार आह़े डॉ़ भाभा हे भारतीय अणुसंशोधनाचे जनक आहेत़ त्यांच्या कर्तबगारीमुळे देशाची या क्षेत्रतील ताकद वाढली आह़े त्यासोबतच डॉ़ भाभा यांनी कर्करोग व शेतीसारख्या विषयांमध्येही मोलाची कामगिरी केली आह़े 
अशा या महान संशोधकाच्या निधनानंतर या बंगल्यात त्यांचे भाऊ जमशेद राहत होत़े जमशेद हे एनसीपीएचे संस्थापक-सदस्य आहेत़ त्यामुळे त्यांच्यानंतर एनसीपीएने बंगल्याच्या जागेचा विकास करण्याचे ठरवले व त्यासाठी इच्छुकांच्या निविदा मागवल्या़ हे गैर असून डॉ़ भाभा यांच्यासारख्या महान संशोधकाच्या बंगल्याचा लिलाव न करता ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आह़े (प्रतिनिधी)

Web Title: Homi Bhabha to be built at Malabar's bungalow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.