होमी व्यारावाला यांना डूडलद्वारे सलाम, पहिल्या महिला वृत्तपत्र छायाचित्रकाराला गूगलची आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 05:05 AM2017-12-10T05:05:54+5:302017-12-10T05:06:07+5:30

देशाच्या पहिला महिला वृत्तपत्र छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा शनिवारी १०४ वा जन्मदिन होता. या निमित्ताने गूगलने त्यांचे अनोखे डुडल तयार करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 Homi Vayarawala salutes Doodle, first female newspaper photographer honors Google | होमी व्यारावाला यांना डूडलद्वारे सलाम, पहिल्या महिला वृत्तपत्र छायाचित्रकाराला गूगलची आदरांजली

होमी व्यारावाला यांना डूडलद्वारे सलाम, पहिल्या महिला वृत्तपत्र छायाचित्रकाराला गूगलची आदरांजली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशाच्या पहिला महिला वृत्तपत्र छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा शनिवारी १०४ वा जन्मदिन होता. या निमित्ताने गूगलने त्यांचे अनोखे डुडल तयार करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. होमी व्यारावाला यांचा जन्म गुजरातमध्ये ९ डिसेंबर १९१३ रोजी झाला होता.
होमी व्यारावाला यांचे वडील एका थिएटर कंपनीचे मालक होते. वडिलांसोबत होमी यांनी लहानपणी भरपूर प्रवास केला. यानंतर,
त्यांचे वडील मुंबईत स्थायिक झाले. येथे त्यांनी मुंबई विद्यापीठ आणि
सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समधून शिक्षण घेतले. छायाचित्रण शिकल्यानंतर त्यांनी कॅमेºयात मुंबईतील जनजीवन टिपणे सुरू केले. काही काळातच त्यांना नोकरी मिळाली. १९३०च्या दशकात त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात
केली होती. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर त्यांनी मुंबईतील ‘द इलस्ट्रेटेड विकली आॅफ इंडिया’
या नियतकालिकासाठी काम करणे सुरू केले. करिअरच्या सुरुवातीला त्यांना कोणीही ओळखत नव्हते.
त्यांचे फोटोज त्यांच्या पतीच्या
नावाने प्रकाशित केले जात होते.
त्यांनी ‘टाइम्स आॅफ इंडिया’च्या
एका फोटोग्राफर अकाउंटंटशी लग्न केले होते.
होमी व्यारावाला यांना पुढे राष्ट्रीय स्तरावर छायाचित्रणासाठी ओळख मिळाली. १९४२ मध्ये त्या आपल्या कुटुंबासह ब्रिटिश सूचना सेवेसाठी काम करण्यासाठी दिल्लीला आल्या. दिल्लीत विविध कार्यक्रमासाठी आलेल्या चीनचे हो ची मिन्ह, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर आणि जॉन एफ. केनेडी यांचेही त्यांनी सुंदर फोटो टिपले. त्यांना महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची भारत यात्रा आणि दलाई लामा तिबेटमधून निघतानाचे फोटो टिपण्याचीही संधी मिळाली. १९७० मध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले. यानंतर १९८२ मध्ये त्या आपला मुलगा फारुकसह बडोद्यात स्थायिक झाल्या. १५ जानेवारी २०१२ रोजी त्यांचे निधन झाले आणि एका उमद्या महिला वृत्तपत्र छायाचित्रकाराने जगाचा निरोप घेतला.

Web Title:  Homi Vayarawala salutes Doodle, first female newspaper photographer honors Google

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई