न्यायालयाकडून पोलिसांची कानउघाडणी

By admin | Published: February 17, 2015 01:35 AM2015-02-17T01:35:37+5:302015-02-17T01:35:37+5:30

संपूर्ण राज्यात गाजलेल्या जवखेडे खालसा येथील दलित जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्येप्रकरणी तपासातील प्रगती सादर का केली नाही? अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांनी कानउघाडणी केली.

The homily of the police from the court | न्यायालयाकडून पोलिसांची कानउघाडणी

न्यायालयाकडून पोलिसांची कानउघाडणी

Next

पाथर्डी (जि. अहमदनगर) : संपूर्ण राज्यात गाजलेल्या जवखेडे खालसा येथील दलित जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्येप्रकरणी तपासातील प्रगती सादर का केली नाही? अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांनी कानउघाडणी केली.
न्यायालयीन कोठडीतील तीनही आरोपींच्या कोठडीत चार दिवसांची वाढ करीत पुढील तारखेस तपास अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
जवखेडेमधील हत्याप्रकरणातील आरोपी दिलीप जाधव, प्रशांत जाधव व अशोक जाधव यांची सोमवारी न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. तपास अधिकारी सुनावणीस का गैरहजर राहिले, खटल्यासंदर्भातील दैनंदिन अहवाल का सादर केला नाही, तपासातील प्रगतीचा उल्लेख नाही, आदी प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. पोलिसांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मागत तपास सुरू आहे, असे उत्तर दिले. (प्रतिनिधी)

Web Title: The homily of the police from the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.